बेळगाव : येळ्ळूर येथील ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ हा फलक हटविल्यानंतर येळ्ळूरच्या जनतेला अमानुष मारहाण करून सात खटले दाखल करण्यात आले. त्यापैकी एका खटल्यातील 19 आरोपींवर तब्बल 9 वर्षानंतर आज सोमवारी आरोप निश्चित (चार्ज फ्रेम) करण्यात आले आहे.
येळ्ळूर येथील ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ फलक प्रकरणातील एका खटल्याची आज सोमवारी सुनावणी होऊन सी.सी. क्र. 126 मधील 24 पैकी 4 जणांना वगळून इतरांवर दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे.
सदर खटल्यात अर्जुन नागाप्पा गोरल, चांगदेव सातेरी देसाई, अनंत भरमाजी चिट्टी, वृशेषन चंद्रकांत पाटील, संभाजी बाबुराव हट्टीकर, शिवाजी शंकर कदम, सुनील नागाप्पा धामणेकर, श्रीकांत शिवाजी नंदुडकर, राहुल मारुती कुगजी, नागेश सुभाष बोबाटे, सुनील रामा कुंडेकर, रवळू महादेव कुगजी, केशव कृष्णा हलगेकर, गणपती इराप्पा पाटील, नामदेव विठ्ठल नायकोजी, केशव महादेव पाटील, रमेश जयराम धामणेकर, रामचंद्र नारायण कुगजी आणि सतीश मनोहर कुगजी असे एकूण 24 आरोपी आहेत.
न्यायालयाच्या तारखांना वारंवार गैरहजर राहिल्यामुळे खटल्यातील परशराम कुंडेकर, गणेश नारायण पाटील, जयवंत पाटील, सातेरी बेलवटकर व रामचंद्र बागेवाडी यांना वगळून इतरांवर आरोप निश्चित करण्याद्वारे हा खटला स्वतःत्र पणे सुरू करण्यात आला आहे.
‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ या फलकासंदर्भातील येळ्ळूरच्या खटल्यांची सुनावणी तब्बल 10 वर्षापासून सुरू आहे. सदर प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या सात खटल्यांपैकी एक खटला निकालात निघाला आहे. उर्वरित सहा खटल्यांपैकी एका खटल्यातील आरोपींवर आज सोमवारी 9 वर्षानंतर आरोप निश्चित करण्यात आले. आरोपींच्यावतीने ॲड. शामसुंदर पत्तार, ॲड. हेमराज बेंचन्नावर व ॲड. श्याम पाटील काम पाहत आहेत.