Monday , December 23 2024
Breaking News

मोदी मंत्रिमंडळाचे खाते वाटप जाहीर; शाह-गडकरींकडील जुनी खाती कायम, नड्डांकडे आरोग्य, तर शिवराज यांच्याकडे कृषी

Spread the love

 

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत देशाचा कारभार हाती घेतला आहे. दरम्यान, शपथविधी सोहळ्यानंतर आज नव्या मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक चालू झाली आहे. या बैठकीत खातेवाटपदेखील करण्यात आलं आहे. मोदींच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात जुन्या काही नेत्यांकडील खाती कायम ठेवण्यात आली आहेत. जसे की, अमित शाह यांच्याकडील गृह विभाग, राजनाथ सिंह (संरक्षण), निर्मला सीतारामण (अर्थ), एस. जयशंकर (परराष्ट्र) आणि नितीन गडकरी यांच्याकडील रस्ते वाहतूक तथा महामार्ग मंत्रालय कायम ठेवण्यात आलं आहे. तर भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडे आरोग्य मंत्रालय सोपवण्यात आलं आहे. दरम्यान, मध्य प्रदेशचं मुख्यमंत्रिपद काढून घेत केंद्रात बोलावणं धाडलेल्या शिवराज सिंह चौहान यांना कृषीमंत्रिपद देण्यात आलं आहे.

मोदींच्या मंत्रिमंडळात कुणाला कोणतं मंत्रालय?
अमित शाह- गृहमंत्रालय
राजनाथ सिंह- संरक्षण मंत्रालय
एस जयशंकर – परराष्ट्र
नितीन गडकरी- रस्ते आणि वाहतूक
निर्मला सीतारमन – अर्थमंत्रालय
शिवराज सिंह चौहान- कृषी मंत्रालय
जतीन राम- सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय
पियुष गोयल -वाणिज्य
अन्नपूर्णा देवी- महिला आणि बाल विकास मंत्रालय
भूपेंदर यादव – पर्यावरण
के राममोहन नायडू- नागरी उड्डाण मंत्रालय
जेपी नड्डा- आरोग्य मंत्रालय
सर्वानंद सोनोवाल – पोर्ट शिपिंग मंत्रालय
सी आर पाटील- जलशक्ती
किरण रिजीजू- संसदीय कार्यमंत्री
धर्मेंद्र प्रधान- शिक्षण मंत्री
अर्जुनराम मेघवाल- कायदा मंत्री
चिराग पासवान – क्रीडा मंत्री, अन्न प्रक्रिया मंत्री
प्रल्हाद जोशी – ग्राहक कल्याण मंत्रालय
गिरिराज सिंह – टेक्सटाइल मंत्रालय
ज्योतिरादित्य शिंदे- सूचना आणि प्रसारण मंत्री
मनसुख मंडाविया- कामगार मंत्री
हरदीप सिंह पुरी- पेट्रोलियम मंत्री
एचडी कुमारस्वामी – अवजड उद्योग मंत्री
मनोहर लाल खट्टर- उर्जा मंत्री, गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालय
राजीव राजन सिंह – पंचायत राज मंत्रालय
विरेंद्र कुमार – सामाजिक न्याय मंत्रालय
ज्युएल ओराम- आदिवासी विकास मंत्री
गिरीराज सिंह – वस्त्रोद्योग मंत्रालय
गजेंद्रसिंह शेखावत- सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्रालय
किशन रेड्डी – कोळसा आणि खाणकाम मंत्रालय

राज्यमंत्री स्वतंत्र कारभार
राव इंद्रजित सिंह- नियोजन, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
जितेंद्र सिंह – विज्ञान आणि तंत्रज्ञान, पंतप्रधान कार्यलय
अर्जुन राम मेघवाल – कायदा आणि न्याय मंत्रालय
प्रतापराव जाधव – आयुष मंत्रालय
जयंत चौधरी – कौशल्य विकास

राज्यमंत्री
श्रीपाद नाईक- गृहनिर्माण आणि ऊर्जा राज्यमंत्री
शोभा करंदाजे – सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय
शांतनु ठाकुर – पोर्ट शिपिंग मंत्रालय, राज्यमंत्री
रवनीत बिट्टू- अल्पसंख्यांक राज्यमंत्री
जितीन प्रसाद – वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय
कृष्णन चौधरी- सहकार मंत्रालय
रामदास आठवले – सामाजिक न्याय मंत्रालय
नित्यानंद राय- गृह मंत्रालय
अनुप्रिया पटेल – आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
व्ही सोमन्ना – जलशक्ती, रेल्वे मंत्रालय
चंद्रशेखर प्रेमासनी- ग्रामीण विकास मंत्रालय
एस पी बघेर – दुग्ध विकास मंत्रालय
क्रितीवर्धन सिंह – पर्यावरण
बी एल वर्मा – सामाजिक न्याय
सुरेश गोपी – पेट्रोलियम, पर्यंटन
एल मुरुगन- माहिती आणि प्रसारण
अजय तम्ता – रस्ते वाहतूक
बंदी संजय कुमार – गृहमंत्री
कमलेश पासवान – कोळसा मंत्रालय
सतीश चंद्र दुबे – खणन मंत्रालय
संजय सेठ – संरक्षण राज्यमंत्री
रणवीर सिंह – अन्न प्रक्रिया
दुर्गादास उइके- आदिवासी विकास मंत्रालय
रक्षा खडसे – युवक कल्याण मंत्रालय
सुकांता मुजुमदार – शिक्षण
सावित्री ठाकुर – महिला आणि बालकल्याण
तोखन साहू – शहर विकास मंत्रालय
भूषण चौधरी – जलशक्ती
भूपेंद्र राजू श्रीनिवास वर्मा – अवजड उद्योग मंत्रालय
हर्ष मल्होत्रा – कॉर्पोरेट अफेअर्स
निमुबेन जयंतीभाई बाम्भनिया – ग्राहक निवारण आणि अन्न वितरण
मुरलीधर मोहोळ – सहकार , नागरी उड्डाण मंत्रालय
जॉर्ज कुरियन – अल्पसंख्याक
पबित्रआ मार्गारेट – परराष्ट्र

About Belgaum Varta

Check Also

सुप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन काळाच्या पडद्याआड

Spread the love  नवी दिल्ली : २०२४ वर्ष संपता संपता एक दु:खद बातमी हाती आली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *