बेळगाव : फोंडा गोवा येथे नुकत्याच साई स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथील जलतरण तलावात संपन्न झालेल्या निमंत्रितांच्या जलतरण स्पर्धेत बेळगाव आबा व हिंद स्पोर्ट्स क्लबच्या जलतरणपटूणी घवघवीत यश संपादन करताना द्वितीय क्रमांकासह तीन वैयक्तिक चॅम्पियनशिप तसेच रनर्सअप चॅम्पियनशिप पटकाविली. यांनी या स्पर्धेत एकूण 67 पदके पटकाविली यामध्ये 26 सुवर्ण 20 रौप्य व 21 कांस्यपदकांचा समावेश आहे.
कुमारी आरोही चित्रगार हिने आपल्या गटामध्ये 6 सुवर्ण पदके, कुमार मोहित काकतकर 6 सुवर्ण पदके, कुमार हर्षवर्धन कर्लेकर याने छोट्या गटांमध्ये 2 सुवर्णपदके पटकावीत वैयक्तिक चॅम्पियनशिप मिळविली. कुमारी धनवी बर्डे 4 सुवर्ण, वेदा खानोलकर 2 सुवर्ण 1 रौप्य 3 कांस्यपदके, कुमारी निधी मुचंडी 2 सुवर्ण 4 रौप्य, कुमार अर्णव किल्लेकर 2 सुवर्ण, कुमार वेदांत पाटील 1 सुवर्ण 2 रौप्य 1 कांस्य, कुमारी प्रिषा पटेल 1 सुवर्ण 1 कास्य, कुमार स्मरण मंगळूरकर 3 रौप्य 1 कांस्य, कुमार तनुज सिंग 3 रौप्य 3 कास्य, कुमार चिन्मय बागेवाडी 2 रौप्य 2 कास्य, कुमारी दिशा होंडी 1 रौप्य 3 कास्य, कुमारी विजयलक्ष्मी पुजारी 1 रौप्य 1 कास्य, कुमार प्रजीत मयेकर 1 रौप्य 1 कास्य, कुमार अद्वैत जोशी 1 रौप्य 1 कास्य, कुमारी अनन्या रामकृष्ण 2 कास्य कुमारी अमूल्या केष्टीकर 2 कास्य व कुमार वर्धन नाकाडी 1कास्य अशी पदके संपादन केली.
वरील सर्व जलतरणपटूना एनआयएस जलतरण प्रशिक्षक श्री. विश्वास पवार, अमित जाधव, रणजीत पाटील, संदीप मोहिते, सतीश धनुचे, शिवराज मोहिते, मारुती घाडी, किशोर पाटील, विशाल वेसणे, विजय बोगन, कल्लाप्पा पाटील, विजय नाईक, निखिल भेकणे, प्रसाद दरवंदर, भरत पाटील, ओम लोहार, ओम घाडी यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभते तर क्लबचे चेअरमन ऍड. मोहन सप्रे, अध्यक्ष श्री. शितल हुलबत्ते, श्री. अरविंद संगोळी, सौ. शुभांगी मंगळूरकर यांचे प्रोत्साहन लाभते.