नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अखेर केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघ सोडला. राहुल गांधी वायनाड लोकसभा मतदारसंघाचा राजीनामा देणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी याबाबत घोषणा केली आहे. प्रियांका गांधी वायनाड लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणुक लढवणार आहेत. तर राहुल गांधी रायबरेलीची खासदारकी कायम ठेवणार आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघाचा राजीनामा देणार आहेत. आज राहुल गांधी यांच्या खासदारकीच्या राजीनाम्यासंदर्भात काँग्रेसची महत्वाची बैठक झाली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही बैठक झाली. या बैठकीला मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी उपस्थित होते. या बैठकीमध्येच राहुल गांधी वाडनाड लोकसभा मतदारसंघातील खासदारकीचा राजीनामा देण्यावर निर्णय झाला. तर राहुल गांधी हे रायबरेलीची खासदारकी कायम ठेवणार आहेत. राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर वायनाड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुक प्रियांका गांधी लढणार आहेत.