पालकमंत्री सतीश जारकीहोळी; पालकमंत्र्यांचा निपाणी दौरा
निपाणी (वार्ता) : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतिश जारकीहोळी यांनी सोमवारी (ता.१७) निपाणी दौरा केला. येथील शासकीय विश्राम धामावर त्यांनी निपाणी मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. शिवाय अनेकांनी विविध समस्याबाबत निवेदने दिली. लवकरच समस्यामुक्त निपाणी मतदारसंघ करण्याचे आश्वासन दिले.
सकाळी अकरा वाजल्यापासूनच शासकीय विश्रामधामावर मतदार संघातील कार्यकर्ते व नागरिक येत होते. पालकमंत्री आल्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून उत्साही स्वागत केले. त्यानंतर नागरिकांनी पाणी, शाळा इमारती, रस्ते, वीज, अंगणवाडी इमारती, जलकुंभ, कुपनलिका, शिक्षक भरती, सरकारी कार्यालयातील कागदपत्रे, घरकुल योजना यासह विविध समस्या मांडल्या. पालकमंत्र्यांनी निवेदने स्वीकारून मूलभूत सुविधांसह विकास कामे करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
यावेळी आमदार काकासाहेब पाटील, माजी मंत्री वीरकुमार पाटील, बुडा आणि जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, चिकोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रोहन साळवे, निपाणी भाग काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, राजेंद्र वड्डर, टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष निकु पाटील, शंकरदादा पाटील, प्रवीण भाटले, पंकज पाटील, सुजय पाटील, बेडकीहाळ भाग काँग्रेस अध्यक्ष बसवराज पाटील, निपाणी भाग महिला काँग्रेस अध्यक्षा वर्षा चव्हाण, सुमित्रा उगळे यांच्यासह माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.