निपाणी (वार्ता) : राजा शिवछत्रपती सांस्कृतिक भवनाचे काम बऱ्याच वर्षापासून रखडले आहे. तात्काळ निधी मंजूर करून त्याचे काम पूर्ण करावे, यासह विविध समस्या सोडवण्याबाबतचे निवेदन माजी नगराध्यक्ष प्रवीण भाटले यांच्या नेतृत्वाखालील माजी नगराध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष, माजी सभापती, नगरसेवकांनी पालकमंत्र्यांना दिले.
माहिती अशी, उद्यानाचे सुशोभीकरण, विकासकामे, जनरेटर व पूलिंग यांसारख्या विद्युत सुविधांची व्यवस्था करणे. निपाणी जवळील यमगरणी गावाजवळील वेदगंगा नदीच्या काठी निपाणी नगरपालिकेच्या मालकीच्या जागेवर घाट व स्मशानभूमी बांधकाम करावे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवावा. त्यासाठी बेळगावहून येताना छत्रपती शिवाजी उद्यान, शिवाजी नगर येथे अनावश्यक उड्डाण न करता शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवावा.
शहरातील अशोक नगर मधील जागेत नगरपालिका ठरावानुसार विश्वगुरू बसवेश्वरा उद्यानाचे बांधकाम करावे. तसेच बसवेश्वरांचा अश्वारूढ पुतळा उभारावा, असे आवाहनही निवेदनात केले आहे. पालकमंत्री जारकिहोळी यांनी निवेदन स्वीकारून टप्प्याटप्प्याने ही विकास कामे मार्गी लावण्याची ग्वाही दिली.
यावेळी माजी मंत्री वीरकुमार पाटील, माजी आमदार काकासाहेब पाटील, लक्ष्मण चिंगळे, राजेंद्र वडर, माजी नराध्यक्ष विजय शेटके, राजेंद्र चव्हाण, गजेंद्र पोळ, किरण कोकरे, निकु पाटील, बबन घाटगे, धनाजी निर्मळे, ॲड. संजय चव्हाण, अशोक लाखे, झाकीर कादरी, रवींद्र श्रीखंडे, जीवन घस्ते, युवराज पोळ, मुकुंद रावण, प्रशांत नाईक, विश्वास पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते.