Monday , December 23 2024
Breaking News

निपाणीतील युवकाचा ‘गाभ’ चित्रपट उद्या प्रदर्शित

Spread the love

 

निपाणीच्या सांस्कृतिक शिरपेचात मानाचा तुरा;
आंतरराष्ट्रीय स्तरावर वाखाणलेला चित्रपट

निपाणी (वार्ता) : येथील लेखक, दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांचा पहिला पूर्ण लांबीचा मराठी चित्रपट ‘गाभ’ हा शुक्रवारी (ता.२१) सर्वत्र प्रदर्शित होत आहे. शासनाच्या वतीने कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अधिकृतरित्या निवडला गेलेला हा चित्रपट असून तेथे याचा जागतिक प्रिमिअर सुद्धा झाला आहे. त्यामुळे हे पाण्याच्या सांस्कृतिक शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने ३६ राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतून प्रदर्शनासह पुरस्कार प्राप्त केले आहेत. निपाणीवासियांसाठी ही अभिमानाची बाब आहे. चित्रपट पाहण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रासह सीमाभागातील नागरिक अतिशय उत्सुक आहेत. ‘गाभ’ या चित्रपटाची संकल्पना, लेखन व दिग्दर्शन अनुप जत्राटकर यांचेच असून ते चित्रपटाचे सहनिर्माता देखील आहेत. सन २००५ पासून लघुपट, माहितीपट निर्मिती क्षेत्रात आपल्या कार्याचा विलक्षण ठसा उमटविल्यानंतर ‘गाभ’ ही एक अत्यंत साधीसोपी ग्रामीण जीवनाशी निगडित, पण आजवर कधीही पडद्यावर न आलेली कथा मोठ्या पडद्यावर घेऊन आले आहेत. शेती, शेतकऱ्यांशी निगडित अनेक चित्रपट आले.विशेषतः शेतकरी आत्महत्या आणि त्यांचे प्रश्न या अनुषंगाने आलेल्या चित्रपटांची संख्या लक्षणीय राहिली.
अनुप जत्राटकर यांनी मात्र दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या, महत्त्वाच्या आणि चित्रपटांच्या इतिहासात कधीही मोठ्या पडद्यावर न आलेल्या प्रश्नाला हात घातला आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या म्हशींना ‘गाभ घालण्याच्या’ अनुषंगाने भेडसावणारी समस्या म्हणजे रेड्यांची वानवा. दूध उत्पादनासाठी आवश्यक असणारी बाब म्हणजे गाभ घालण्याची प्रक्रिया. रेड्यांची संख्या ही फार कमी होत चालली आहे. नेमकी हीच समस्या ‘गाभ’ चित्रपटाच्या मध्यवर्ती आहे. माणसांत कमी होत चाललेली मुलींची संख्या या विरोधाभासावरती ‘गाभ’ हा चित्रपट भाष्य करतो.
‘तुझ्यापायी मन झालं येडं रं खुळं’ या सावनी रविंद्र आणि प्रसेनजीत कोसंबी यांनी गायिलेल्या श्रवणीय गीताने तरुणाईला वेड लावले आहे. देशभरातल्या तरुणाईनं त्यावर रिल्स करून समाजमाध्यमांवर टाकले आहेत.चित्रपटाचे दुसरे गणे ज्येष्ठ गायक आनंद शिंदे यांनी म्हटले आहे. ‘मी तुझा रेडा, तू माझी म्हस गं’ हे लोकगीताचा बाज असणारे गाणेही आनंद शिंदे यांच्या चाहत्यांसह सर्वांच्याच ओठावर येऊ लागले आहे. या चित्रपटाचे गीतकार, संगीतकार चंद्रशेखर जनवाडे हे निपाणीजवळील बेनाडी या गावचे आहेत. चित्रपटाचला साजेसे गीतलेखन आणि संगीत त्यांनी दिले आहे. या चित्रपटगीतांचे मास्टरिंग हे लंडन येथील प्रख्यात हॅफोड मास्टरिंग वेल्सच्या गेथीन जॉन यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

संकेश्वर स्थायी समिती सभापतीपदी प्रमोद होसमणी यांची निवड

Spread the love  संकेश्वर : संकेश्वर नगरपालिकेची मंगळवारी बैठक संपन्न झाली. यावेळी बैठकीत विविध विषयांवर …

2 comments

  1. sangeeta Ajarekar

    अनुप जत्राटकर तुझं हार्दिक आभिनंदन, ।

    • sangeeta Ajarekar

      ” गाभ” या चित्रपटाबद्दल ,अनुप जत्राटकरच हार्दिक आभिनंदन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *