डेंग्यू जनजागृती शिबिर
बेळगाव : नियती फाऊंडेशन व राजमाता जिजाऊ सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर्स डे निमित्त डेंग्यूबाबत जनजागृती व प्रतिबंधात्मक औषध वाटप करण्यात आले. दीपप्रज्वलन करून पूजा केल्यानंतर डॉ. सोनाली सरनोबत यांनी आपल्या सामाजिक जबाबदारीबद्दल मार्गदर्शन केले. डॉ. सुधीर बीके यांनी डेंग्यू आणि प्रतिबंध याविषयी सांगितले. डॉ. सोनाली सरनोबत यांनी महिला सक्षमीकरणाचे प्रतीक म्हणून नियती फाऊंडेशनकडून श्रीमती मंगल पाटील यांना एक शिलाई मशीनची मदत देऊ केली.
शाहुनगर येथील रहिवाशांसह महिला व बालकांना डेंग्यूचे थेंब देण्यात आले.
दीपाली मलकरी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
डॉ. सुधीर बीके, युवा परिवर्तन समन्वयक प्रवीण सुळगेकर, माजी सेवा कर्मचारी सिद्धप्पा हिंगमिरे, मंगल पाटील, गीतांजली चौगुले, दीपाली मलकरी, कांचन चौगुले आदी उपस्थित होते.