बेळगाव : येथील चंदगड तालुका बेळगाव रहिवासी संघटना बेळगाव. आणि चंदगड मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने, गुणी विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ आयोजित करत आहोत. सदर कार्यक्रम संस्था व संघटनेच्या सभासदांच्या मुलांसाठी असून पहिली ते पाचवी पर्यंतच्या होतकरू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याची वितरण तसेच दहावी व बारावीच्या 70 टक्के वरील गुणी विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ वैभव हाल, मेन रोड, ज्योती नगर कंग्राळी के. एच. बेळगाव येथे रविवार दि. 7/7/2024 रोजी सकाळी 11 वा. आहे. तरी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुणपत्रिकेचे झेरॉक्स तसेच पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी आपली नावे, रामदेव गल्ली येथील संस्था कार्यालय, चंदगड मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड बेळगाव येथे नोंदवावीत, असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक एम. के. पाटील करत आहेत.