Tuesday , September 17 2024
Breaking News

बेळगावात बनावट नोटा छापणारी टोळी गजाआड

Spread the love

 

बेळगाव : गोकाक-बेळगाव रस्त्यावरील कडबगट्टी गावातून जाणाऱ्या रस्त्याने प्रवास करणाऱ्या कारची तपासणी केली असता, 100 व 500 रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्याने पाच जणांना अटक करण्यात आली, अशी माहिती बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमा शंकर गुळेद यांनी दिली. सकाळच्या गस्तीवरील पोलिसांनी केलेल्या तपासणीत हे प्रकरण उघडकीस आले.

मुडलगी तालुक्यातील अरबी येथील अन्वर मोहमद सलीम यादव, महालिंगापूर येथील सद्दाम मुसा यादहल्ली, रवी चन्नप्पा हगडी, दुंडप्पा महादेव वनशेनवी व विठ्ठल हणमंत होसकोटे यांना अटक करण्यात आली.
बेळगावचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमा शंकर गुळेद यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, २९ जून रोजी गोकाक तालुक्यातील नाका येथून कडबगट्टी रस्त्याने बेळगावकडे जाणाऱ्या पांढऱ्या स्विप्ट कारमध्ये 100 रु. दर्शनी मूल्याचे 305 आणि 500 रुपयांच्या 6792 बनावट नोटा घेऊन जात असताना गोकाक पोलिसांनी तपासणी करून अन्वर महमदसलीम यादव (वय 26, रा. अरभावी), सद्दाम मुसा यादहल्ली (27), दुंडाप्पा महादेव म्हैशेवी (27), रवी चन्नाप्पा हागडी (27), विठ्ठल हणमंत होसकोटी (29), मल्ल अल्लाप्पा कुंबळी (वय 29, रा. महालिंगापूर) यांना अटक करून न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

चौकशीत आरोपींनी गोकाक, महालिंगापूर, मुधोळ, यरगट्टी, हिडकल धरण, बेळगाव, धारवाड यासह विविध जिल्ह्यांमध्ये 1 लाखाच्या खऱ्या नोटांसाठी 4 लाखांच्या बनावट नोटा देऊन जनतेची फसवणूक केल्याची कबुली दिली. आरोपी अन्वर यादव याच्या घरातून बनावट नोटा छापण्यासाठी वापरलेले संगणक, सीपीयू, प्रिंटर, स्क्रीनिंग बोर्ड, पेंट, शायनिंग, स्टिकर, डेकोटिंग पावडर, प्रिंटिंग पेपर, कटर ब्लेड, सहा मोबाईल, एक पांढऱ्या रंगाची कार असा 5,23,900 रुपयांचा मुद्देमाल तसेच मौल्यवान मालमत्ता जप्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

चांगळेश्वरी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचालित श्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *