बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था मुंबई व गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक 3 जुलै रोजी आयोजित बेळगाव परिसरातील माध्यमिक शाळेतील मुलांसाठी पावसाळी कवी संमेलन संपन्न झाले.
या पावसाळी कवी संमेलनात बेळगाव परिसरातील मराठी माध्यमाच्या मुलांनी सहभाग घेतला होता. या कवी संमेलनात मुलांनी वेगवेगळ्या विषयावर आशयघन कविता सादर करून प्रेक्षकांची व परीक्षकांची वाहवा मिळविली. या कवी संमेलनात मी आणि ते, मैत्रीण, त्या दोघी, मी का समजले नाही, शाळा, शाळेची निवडणूक, गुरुजी तुमच्यामुळे, माझे बाबा, राजर्षी शाहू, आकाश, स्वप्न, आकाशगंगा, मोबाईल नावाचा दानव, रस्ता, अर्थ जीवनाचा, हरवून जाशील जीवनाचे भान, अशा वेगवेगळ्या विषयावर कविता सादर केल्या. यामध्ये बेळगाव परिसरातील गौतम पावशे, श्रेया घोळसे, प्रियदर्शनी काकतकर, संयोगिता हुंदळेकर, समीर पाखरे, सोहम हळदणकर, स्नेहा हिरोजी, सरिता पाटील, प्रथमेश चांदीलकर, अनुष्का पाटील, ऐश्वर्या कंग्राळकर, स्वरा पाटील, प्रसाद मोळेराखी, आर्यन पाटील, अनिकेत पाटील, शंतनु मनगुतकर या विद्यार्थ्यांनी कविता सादर केल्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला नवोदित कवयित्री पूजा भडांगे यांनी मुलांना मराठी साहित्याबद्दल मार्गदर्शन केले व स्वतःच्या काही कविता सादर केल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक साठे प्रबोधिनीचे सदस्य श्री. बी. बी. शिंदे सर यांनी केले. आभार हर्षदा सुणठणकर यांनी मांडले तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऊर्वी आनंद पाटील हिने केले. हे कवी संमेलन यशस्वी पूर्ण होण्यासाठी श्री. इंद्रजीत मोरे, श्री. प्रसाद सावंत, श्री. धीरजसिंह राजपूत, श्री. बाळकृष्ण मनवाडकर, श्री. नारायण उडकेकर, श्री. गजानन सावंत, नीलू आपटे यांनी परिश्रम घेतले.