बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी आज शहरातील विविध ठिकाणी भेट देऊन साफसफाईच्या कामाची पाहणी करून फॉगिंग फवारणी केली. अनगोळ बीट कार्यालयात सफाई कामगारांच्या ऑनलाइन बायोमेट्रिक आणि ऑफलाइन उपस्थितीची माहिती घेऊन पाहणी केली.
नाथ पै सर्कलला भेट देऊन स्वच्छतेच्या कामाची पाहणी केली, इंदिरा कॅन्टीनला भेट देऊन जेवणाचा दर्जा तपासला. कपिलेश्वर मंदिराजवळ येऊन त्यांनी फॉगिंग यंत्राची पाहणी करून त्यांनी स्वतः फॉगिंग केले. त्यांनी सर्व आरोग्य निरीक्षकांना मलेरिया प्रतिबंधक फवारणी व फॉगिंग प्रत्येक वॉर्डात दररोज सक्तीने करण्याचे निर्देश दिले.