Monday , December 23 2024
Breaking News

यूपीएससीचे अध्यक्ष मनोज सोनी यांचा तडकाफडकी राजीनामा

Spread the love

 

नवी दिल्ली : प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या यूपीएससी परीक्षेतील गैरव्यवहाराची सध्या देशभरात जोरदार चर्चा सुरू असतानाच आता केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष मनोज सोनी यांनी कार्यकाळ संपण्याआधीच राजीनामा दिला आहे. मनोज सोनी यांचा कार्यकाळ २०२९ पर्यंत होता. यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सोनी यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिला असून त्याचा पूजा खेडकर प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे सांगितले जात आहे. पूजा खेडकर यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाला बोगस अंपगत्व आणि ओबीसी नॉनक्रिमीलेयरचे प्रमाणपत्र देऊन परीक्षा उत्तीर्ण केली. तसेच त्यांनी नाव आणि इतर माहिती बदलून अनेकवेळा यूपीएससीची परीक्षा दिल्याचा आरोप केला जात आहे.

मनोज सोनी हे २०१७ साली केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या घटनात्मक मंडळाचे सदस्य झाले. १६ मे २०२३ रोजी त्यांची लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडूनच नागरी सेवा परीक्षा घेण्यात येते. तसेच प्रशासकीय व्यवस्थेमधील आयएएस, आयपीएस आणि आयएफएस अशा उच्च अधिकाऱ्यांची निवड करण्याचे काम केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून केले जाते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज सोनी यांनी एक महिन्यापूर्वीच राष्ट्रपतींकडे आपला राजीनामा सोपविला होता. त्यांचा राजीनामा स्वीकारला गेला आहे की नाही? याबाबत मात्र काही निश्चित माहिती मिळालेली नाही. यूपीएससीचे सदस्य होण्यापूर्वी मनोज सोनी यांनी गुजरातमधील दोन विद्यापीठांचे कुलगुरू म्हणून काम पाहिले होते.

यूपीएससीच्या विश्वासाहर्तेवर प्रश्नचिन्ह
पूजा खेडकर यांचे फसवणुकीचे प्रकरण समोर आल्यानंतर सोशल मीडियावर अनेक बोगस आयएएस अधिकाऱ्यांची प्रकरणे समोर आली होती. ओबीसी आणि आर्थिक मागस प्रवर्गाचा फायदा घेऊन काहींनी यूपीएससी परीक्षेत लाभ मिळविल्याचा आरोप करण्यात आला. तसेच काही अधिकाऱ्यांनी खोटे अंपगत्वाचे प्रमाणपत्र देऊन यूपीएससीची दिशाभूल केली असल्याचे सांगितले गेल. त्यामुळे यूपीएससीच्या विश्वासाहर्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले.

About Belgaum Varta

Check Also

सुप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन काळाच्या पडद्याआड

Spread the love  नवी दिल्ली : २०२४ वर्ष संपता संपता एक दु:खद बातमी हाती आली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *