बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत असून जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे.
बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यात घटप्रभा नदीला पूर आल्याने 300 हून अधिक घरे, 150 हून अधिक दुकाने पाण्याखाली गेली आहेत, बाजारपेठ, दुकाने, रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत.
घरे, दुकाने, बेकरी, गॅरेज जलमय होऊन अराजकता निर्माण झाली आहे. रात्रभर अनेक लोकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करत आहेत. दुकानातील साहित्य हलवले जात आहे. घटप्रभा नदीने रौद्र रूप घेतले असून गोकाक येथील नागरिक भयभीत झाले आहेत.