बेळगाव : बेळगाव तालुक्यातील होनगा गावातील प्रणाली परशुराम हिंदरे या १४ वर्षीय बालिकेचा डेंग्यूच्या आजाराने मृत्यू असल्याची माहिती मिळाली आहे.
सदर बालिकेला रविवारी फक्त दोन वेळा उलट्या झाल्या आणि सोमवारी तिला ताप आला. प्रणालीच्या कुटुंबीयांनी तिला मंगळवारीच जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार न झाल्याने तिचा आज मृत्यू झाला. ती होनगा येथील मराठा मंडळ विद्यालयात आठवी वर्गात शिकत होती. तिच्या निधनामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.