Sunday , December 22 2024
Breaking News

अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील 10 राज्यमार्ग व 53 प्रमुख जिल्हा मार्ग बंद

Spread the love

 

कोल्हापूर : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 10 राज्य मार्ग व 53 प्रमुख जिल्हा मार्ग असे एकूण 63 मार्ग बंद झाले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समन्वय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

करवीर येथील राज्य मार्ग 194 वरील शाहू नाका कळंबे साळोखेनगर, बालिंगे, शिंगणापूर, चिखली, राष्ट्रीय महामार्ग क्र. 204 वडणगे निगवे दुमाला, शिये टोप राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 ला मिळणारा ते एमआयडीसी पूल कसबा बावडा रस्ता शिंगणापूर बंधाऱ्यावर पाणी आल्याने रस्ता वाहतुकीस बंद पर्यायी आंबेवाडी, चिखली मार्गे वाहतुक सुरु. तसेच शिये कसबा बावडा रस्त्यावर महानगरपालिका हद्दीत पाणी आल्याने वाहतुक बंद पर्यायी मार्ग शिये फाटा राष्ट्रीय महामार्ग शिरोली नाका, कोल्हापूर मार्गे सुरु.

चंदगड येथील राज्य मार्ग 189 वरील कोल्हापूर- गारगोटी-गडहिंग्लज- नागणवाडी-चंदगड-हेरे तिलारी रस्ता चंदगड पुलावर 2 फूट पाणी आल्याने वाहतुक बंद पर्यायी राज्य महामार्ग 189 ते प्रजिमा 76 पाटणे फाटा मार्गे राज्य महामार्ग 180 वरुन हलकर्णी फाटा दाटे मार्गे चंदगड मार्गे वाहतुक सुरु.

गडहिंग्लज येथील राज्य मार्ग 189 वरील कोल्हापूर- गारगोटी-गडहिंग्लज- नागणवाडी-चंदगड-हेरे तिलारी रस्ता भडगाव पुलावर पाणी आल्याने वाहतुक बंद आहे. पर्यायी गिजवणे, बेळगुंदी, इंचनाळ, गजरगाव, महागाव प्रमुख जिल्हा मार्ग 83 मार्गे वाहतुक सुरु.

करवीर येथील राज्य मार्ग 189 वर कोल्हापूर, गारगोटी, गडहिंग्लज, नागणवाडी, चंदगड, हेरे, तिलारी रस्ता हळदी गावात 1 फूट पाणी आल्याने वाहतूक बंद आहे. पर्यायी कोल्हापूर, इस्पुर्ली, शेळेवाडी मार्गे वाहतुक सुरु आहे.

भुदरगड- रामा 189 वरील कोल्हापूर, गारगोटी, गडहिंग्लज, नागणनवाडी, चंदगड, हेरे, तिलारी रस्ता रामा 189 वर मडिलगे येथे 4 फूट पाणी आल्याने वाहतुक बंद पर्यायी मार्ग नाही.

राधानगरी येथील राज्य मार्ग 178 वर देवगड-राधानगरी-मुरगुड-निपाणी वर मुरगूड जवळ 3 फूट पाणी आल्याने वाहतुक बंद आहे. पर्यायी रस्ता मुरगुड, चिमगाव मार्गे गारगोटी व कोल्हापूर तसेच निढोरी कागल मार्गे वाहतुक सुरु आहे.

चंदगड येथील राज्य मार्ग 201 वर चंदगड-हिंडगाव-इब्राहिमपूर चितळे- आजरा रस्ता इब्राहिमपूर पुल (घटप्रभा नदी) किमी 5/600, 3 फूट पाणी आल्याने वाहतुक बंद आहे पर्यायी  रामा 180 ते कुरणी, गवसे, इब्राहिमपूर, अडकूर प्रजिमा 66 मार्गे वाहतुक सुरु आहे.

आजरा येथील रा.मा.201 वरील चंदगड, हिंडगाव, इब्राहिमपूर, चितळे, आजरा रस्ता उचंगी धरणाचे बॅक वॉटर मधील मोरी व पाणी आल्याने रस्ता बंद पर्यायी वाटंगी, अर्जुनवाडी प्रजिमा 64 मार्गे वाहतुक सुरु आहे.

गगनबावडा येथील  राज्य मार्ग 193 वरील आंबेवाडी, चिखली, वरनगे पाडळी, यवलुज, बाजारभोगाव, अनुस्कुरा मार्गावर कासारी नदीचे 4 फूट पुराचे पाणी आल्याने रस्ता वाहतुकीस बंद पर्यायी पोहाळे, पोहळवाडी मार्गे बाजारभोगाव मार्गे वाहतुक सुरु आहे.

पन्हाळा येथील राज्य मार्ग 193 वरील आंबेवाडी, चिखली, वरनगे पाडळी, यवलुज, बाजारभोगाव, अनुस्कुरा मार्गावर कासारी नदीचे 5 फूट पुराचे पाणी आल्याने रस्ता वाहतुकीस बंद पर्यायी मलकापूर मार्गे कोल्हापूर वाहतुक सुरु आहे.

करवीर येथील राज्य मार्ग 193 वरील आंबेवाडी, चिखली, वरनगे पाडळी, यवलुज, बाजारभोगाव, अनुस्कुरा मार्गावर प्रयाग पुलावर पाणी आल्याने रस्ता वाहतुकीस बंद पर्यायी बालिंगे, खुपिरे, येवलूज, निटवडे, वरणगे, पाडळी मार्गे वाहतुक सुरु आहे.

शिरोळ येथील राज्य मार्ग 195 वर रा.मा.क्र. 178 पासून निढोरी, गोरंबे, कागल , सांगाव, यळगुड, रेंदाळ, रांगोळी, हेरवाड रा.मा. क्र. 153 ला मिळणारा राज्य मार्ग क्र. 195 वर 4 फुट पाणी आल्याने रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला आहे पर्यायी मार्ग हेरवाड, पाचवा मैल मार्गे वाहतुक सुरु आहे.

हातकणंगले येथील राज्य मार्ग  195 वर रा.मा.क्र. 178 पासून निढोरी, गोरंबे, कागल , सांगाव, यळगुड, रेंदाळ, रांगोळी, हेरवाड रा.मा. क्र. 153 ला मिळणारा राज्य मार्ग क्र. 195 वर 1 फुट पाणी आल्याने रस्ता वाहतुकीस बंद पर्यायी रेंदाळ, हुपरी, पट्टणकोडोली, रुई मार्गे वाहतुक सुरु आहे.

करवीर येथील राज्‍य मार्ग 194 A वर राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 जाजल पेट्रोल पासून कणेरी, गिरगाव ते राज्यमागर्ग क्र. 196 नंदवाळ, रामा 189 वाशी, महे, कोगे, कुडीत्रे फॅक्टरी रामा 177 वाकरे फाटा, खुपीरे, यवलुज, वरणगे, केर्ली, निगवे, टोप, नागाव, मौजे वडगांव, हेर्ले प्ररामा 6 (रा.म.मा.166)  रुकडी फाटा, रुकडी बंधारा, चिंचवाड, वसगडे, सांगवडे, हलसवडे, विकासवाडी ते राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 जाजल पेट्रोल पंपाजवळ मिळणारा रस्ता रा.मा. 194 अ वर कुडीत्रे, कोगे पुलावर पाणी आल्याने रस्ता वाहतुकीस बंद पर्यायी कोगे फाटा, बालिंगे, कुडीत्रे मार्गे वाहतुक सुरु आहे.

हातकणंगले येथील राज्य मार्ग 192 वर पन्हाळा, वाघबीळ, बोरपाडळे, वाठार तर्फे वडगाव, हातकणंगले, इचलकरंजी, शिरदवाड, शिवनाकवाडी राज्य हद्दीपर्यंतचा पंचगंगा नदीवरील लहान पुलावरुन पाणी वाहत असल्याने लहान पुलावरुन वाहतुक बंद करण्यात आली आहे. पर्यायी इचलकरंजी, कबनुर, रुई, पट्टणकोडोली, हुपरी मार्गे  वाहतुक सुरु आहे.

हातकणंगले येथील राज्य मार्ग 192 वर पन्हाळा, वाघबीळ, बोरपाडळे, वाठार तर्फे वडगाव, हातकणंगले, इचलकरंजी, शिरदवाड, शिवनाकवाडी राज्य हद्दीपर्यंतचा यशदा पूल बाह्य वळण रस्त्यावर पाणी आल्याने रस्ता वाहतुकीस बंद असून पर्यायी इचलकरंजी, कबनुर, रुई, पट्टणकोडोली, हुपरी मार्गे वाहतुक सुरु आहे.

शिरोळ येथील राज्य मार्ग 200 वरील प्र.रा.मा. 6 पासून अतिग्रे, कबनूर, इचलकरंजी, टाकवडे, शिरढोण, मजरेवाडी, अकिवाट, टाकळी, खिद्रापूर ते जिल्हा हद्द रा.मा. 200 वर शिरढोण पुलावर 4.5 फुट पाणी आल्याने रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला असून पर्यायी इचलकरंजी, यड्राव, नांदणी, शिरोळ, कुरुंदवाड मार्गे वाहतुक सुरु आहे.

चंदगड येथील राज्य मार्ग 180 वरील जिल्हा हद्दीपासून शिरगांव, नागनवाडी, मजरे, तडशिनहाळ, बेळगांव राज्य हद्दीपर्यंत राज्य मार्ग क्र. 180 वर (दाटे गावाजवळ) अंदाजित 1 फूट पाणी आल्याने वाहतुक बंद असून पर्यायी रामा 180 ते तांबूळवाडी, बगीलगे, माणगांव इजिमा 191 ते सोनारवाडी, आमनोळी ते रामा 189 मार्गे वाहतुक सुरु आहे.

प्रमुख जिल्हा मार्ग

शिरोळ- प्रजिमा 123 वर चिंचवाड, शिरोळ, कुरुंदवाड, बस्तवाड, अकीवाट, खिद्रापूर रस्ता प्रजिमा 123 वर शिरोळ केटीवेयर वर 7 फूट पाणी आल्याने वाहतुक बंद पर्यायी कुरुंदवाड, शिरोळ रामा 153 मार्गे वाहतुक सुरु करण्यात आली आहे.

शिरोळ- प्रजिमा 123 वर चिंचवाड, शिरोळ, कुरुंदवाड, बस्तवाड, अकीवाट, खिद्रापूर रस्ता प्रजिमा 123 वर अनवटी ओढ्यावर 7 फूट पाणी आल्याने  रस्ता बंद पर्यायी कुरुंदवाड, शिरोळ रा.मा. 153 मार्गे वाहतुक सुरु करण्यात आली आहे.

शिरोळ- प्रजिमा 123 वर चिंचवाड, शिरोळ, कुरुंदवाड, बस्तवाड, अकीवाट, खिद्रापूर रस्ता प्रजिमा 123 वर  बस्तवाड ओढ्यावर 3 फूट पाणी आल्याने रस्ता बंद पर्यायी कुरुंदवाड, शिरोळ रामा 153 मार्गे वाहतुक सुरु करण्यात आली आहे.

शिरोळ- प्रजिमा 105 वर प्ररामा 6 पासून जयसिंगपूर, नांदणी, शिरढोण ते अब्दुललाट रस्ता प्रजिमा 105 वर पाणी आल्याने रस्ता बंद पर्यायी नांदणी, हरोली, जांभळी, टाकवडे मार्गे वाहतुक सुरु करण्यात आली आहे.

शिरोळ- प्रजिमा 92 वरील रामा क्र. 200 (मजरेवाडी)  श्री गुरुदत्त साखर कारखाना ते टाकळीवाडी, घोसरवाड, काळम्मावाडी वसाहत, घोसरवाड नदी पानवठा ते कर्नाटक राज्य हद्दीपर्यंत रस्ता प्रजिमा 92 वर 5 फुट पाणी आल्याने रस्ता बंद पर्यायी मार्ग नाही.

शिरोळ- प्रजिमा 31 वरील रामा 200 पासून कबनुर, गंगानगर, सा.का. शहापूर, यड्राव सुतगिरणी, जांभळी, हरोली, नांदणी, धरणगुत्ती ते शिरोळ रा.मा. क्र.153 ला मिळणारा प्रजिमा क्र. 31 वर 3 फुट पाणी आल्याने रस्ता बंद पर्यायी नांदणी, जयसिंगपूर, शिरोळ मार्गे वाहतुक सुरु आहे.

शिरोळ- प्रजिमा 31 वरील रामा 200 पासून कबनुर, गंगानगर, सा.का. शहापूर, यड्राव सुतगिरणी, जांभळी, हरोली, नांदणी, धरणगुत्ती ते शिरोळ रा.मा. क्र.153 ला मिळणारा प्रजिमा क्र. 31 वर 5 फुट पाणी आल्याने रस्ता वाहतुकीस बंद पर्यायी नांदणी, जयसिंगपूर, शिरोळ मार्गे वाहतुक सुरु आहे.

शिरोळ- प्रजिमा 73 वरील रा.मा. 153 पासून कुरुंदवाड, नांदणी ते प्ररामा 6 ला मिळणारा रस्ता प्र.जि.मा 73 वर 2.5 फूट पाणी आल्याने रस्ता वाहतुकीस बंद असून पर्यायी कुरुंदवाड, शिरोळ, जयसिंगपूर, नांदणी मार्गे वाहतुक सुरु आहे.

हातकणंगले- प्रजिमा 109 वरील वडगांव, लाटवडे, भेंडवडे, खोची ते दुधगांव, आष्टा जिल्हा हद्द रस्ता प्रजिमा क्र. 109 वर रस्त्यावर पाणी आल्याने रस्ता वाहतुकीस बंद असून पर्यायी भेंडवडे, लाटवडे, भादोले, आष्टा मार्गे वाहतुक सुरु आहे.

हातकणंगले- प्रजिमा 96 वरील जिल्हा हद्द निलेवाडी, जुने पारगांव, नवे पारगांव, पाडळी, अंबप, वडगांव, तासगांव, मौजे वडगांव ते रामा क्र. 194 रस्ता प्रजिमा 96 वरील वारणा नदी पुलावर पाणी आल्याने वाहतुक बंद असून पर्यायी अमृत नगर, चिकुर्डे मार्गे वाहतुक सुरु आहे.

आजरा- प्रजिमा 58 वरील प्रजिमा 52 पासून नवले, देवकाडगांव, कोरीवडे, पेरनोली, साळगाव रामा क्र. 188 ला मिळणारा प्रजिमा क्र. 58 वर साळगाव बंधाऱ्यावर पाणी आल्याने वाहतुक बंद असून पर्यायी सोहळे, बाची मार्गे वाहतुक सुरु आहे.

करवीर- प्रजिमा 37 वरील प्रजिमा क्र .29 पासून शिरोली दुमाला, बाचणी, सडोली, खा. हळदी, कुर्डू, इस्पुर्ली, नांगाव, नंदगांव, एकोंडी, व्हन्नूर ते रामा क्र. 195 ला पिंपळगांव नजिक मिळणारा प्रजिमा क्र. 37 वर बाचणी बंधारा पाण्याखाली गेल्याने वाहतुक बंद पर्यायी बाचणी, सडोली खालसा, हळदी मार्गे वाहतुक सुरु आहे.

करवीर- प्रजिमा 29 वरील रामा क्र. 193 यवलुज, दोनवडे ते रामा 177 पुढे बालिंगे, महेपाटी, बीड, शिरोली, सडोली दुमाला, चाफोडी, गरजण, कोते, चांदे, धामोड, शिरगाव, तारळे खु, पडळी, कारिवडे, ओलवन, तारळे खुर्द, कसबा तारळे, पिरळ, पडळी मार्गावरील क// बीड व महे पुलावर पाणी आल्याने वाहतुक बंद पर्यायी बालिंगे, कुंभी, कारखाना, सांगरुळ, महारुळ, बीडशेड मार्गे वाहतुक सुरु आहे.

करवीर- प्रजिमा 42 वरील चांदे, घुंगुरवाडी, हसुर, येवती पाटी, वडकशिवाले, बाचणी साके प्रजिमा 42 वर पाणी आल्याने बाचणी धरणावर पाणी आल्याने रस्ता बंद पर्यायी इस्पुर्ली, नागाव, नंदगाव, खेबवडे, बाचणी, साके मार्गे वाहतुक सुरु आहे.

करवीर- प्रजिमा 42 वरील चांदे, घुंगुरवाडी, हसुर, येवती पाटी, वडकशिवाले, बाचणी, साके प्रजिमा 42 वरील हसुर कुरुकली रस्त्यावर पुलाच्या जोड रस्त्यावर पाणी आल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद असून पर्यायी  मार्ग हसुर, सडोली, हळदी मार्गे वाहतुक सुरु आहे.

गडहिंग्लज- प्रजिमा 86 रा.मा.  188 ते निलजी, नूल, प्रजिमा 56 ते प्रजिमा 57 पासून येणेचवंडी, नंदनवाड, रा.मा. 201 ला मिळणारा प्रजिमा 86 वर बंधाऱ्यावर 1 फूट पुराचे पाणी आल्याने बॅरीकेटींग लावून वाहतुक बंद असून पर्यायी जराळी, दुंडगे प्रजिमा 80 मार्गे वाहतुक सुरु आहे.

कागल- प्रजिमा 46 वर प्र. 43 बिद्री, सोनाळी, सावर्डे बु., सावर्डे खु., केनवडे, गोरंबे, आनुर, बस्तवडे ते रामा क्र. 178 ते हमीदवाडा, नंद्याळ ते प्र. 54 ला मिळणारा प्रजिमा क्र. 46 वर वेदगंगा नदीचे साखळी क्र. 18/600 3 फूट आल्याने पाणी रस्त्यावर रस्ता बंद पर्यायी राज्य मार्ग 178 राधानगरी, मुरगुड, निपाणी रस्त्यावरुन चालू व राज्य मार्ग 195 निढोरी, गोरंबे, कागल मार्गे वाहतुक सुरु आहे.

कागल- प्रजिमा 47 वरील रामा क्र. 178 सोनगे, बस्तवडे, कौलगे, चिखली, खा. कुर्ली राज्य हद्द प्र.क्र. 47 वरील कर्नाटक हद्दीतील वेदगंगा नदीचे पाणी पुलावर 4 फूट पाणी आल्याने रस्ता बंद पर्यायी मार्ग इस्पुर्ली नागाव, नंदगाव, खेबवडे, बाचणी साके मार्गे सुरु करण्यात आली आहे.

कागल- प्रजिमा 47 रामा क्र. 178 सोनगे, बस्तवडे, कौलगे, चिखली खा. कुर्ली राज्य हद्द प्र.क्र. 47 वर कर्नाटक हद्दीतील वेदगंगा नदीचे 2 फुट पाणी पुलावर आल्याने रस्ता बंद असून पर्यायी इस्पुर्ली, नागाव, नंदगाव, खेबवडे, बाचणी, साके मार्गे वाहतुक सुरु आहे.

कागल- प्रजिमा 47 रामा क्र. 178 सोनगे, बस्तवडे, कौलगे, चिखली खा. कुर्ली राज्य हद्द प्र.क्र. 47 वर वर कर्नाटक हद्दीतील वेदगंगा नदीचे 5 फुट पाणी पुलावर आल्याने रस्ता बंद असून पर्यायी इस्पुर्ली, नागाव, नंदगाव, खेबवडे, बाचणी, साके मार्गे वाहतुक सुरु आहे.

कागल- प्रजिमा 50  रामा क्र. 178 सोनगे, बस्तवडे, कौलगे, चिखली खा., कुर्ली राज्य हद्द प्र.क्र. 47 वर सरपिराजी तलावाचे सांडव्याचे पाणी 2 फूट इतके रस्त्यावर आल्यने वाहतुक बंद पर्यायी राज्य मार्ग 178 राधानगरी, मुरगूड, निपाणी व प्रजिमा क्र. 51 लिंगनूर, कापशी, माध्याळ मार्गे वाहतुक सुरु आहे.

गगनबावडा- प्रजिमा 39 वरील परखंदले, गोठे, पनुत्रे, हरपवडे, धुंदवडे, गारीवडे, गगनबावडा रस्ता प्रजिमा 39 वर गोठे पुलावर 5 फुट पाणी आल्याने रस्ता बंद पर्यायी म्हासुर्ली मार्गे चौधरवाडी मार्गे वाहतुक सुरु आहे.

गगनबावडा- प्रजिमा 39 वरील परखंदले, गोठे, पनुत्रे, हरपवडे, धुंदवडे, गारीवडे, गगनबावडा रस्ता प्रजिमा 39 वर पुराचे 2 फुट पाणी आल्याने रस्ता बंद पर्यायी शेणवडे, अंदुर, धुंदवडे मार्गे वाहतुक सुरु आहे.

गगनबावडा- प्रजिमा 25 वरील अणदूर, मांडुकली, वेतवडे, गोटमवाडी, गोठे, प्रजिमा 25 वर 3 फुट पाणी आल्याने वाहतुक बंद असून पर्यायी अणदूर, धुंदवडे रस्ता प्रजिमा 34 मार्गे वाहतुक सुरु आहे.

गगनबावडा- प्रजिमा 25 वरील अणदूर, मांडुकली, वेतवडे, गोटमवाडी, गोठे, प्रजिमा 25 वर मोहरीवर 5 फुट पाणी आल्याने वाहतुक बंद असून पर्यायी अणदूर, धुंदवडे रस्ता प्रजिमा 34 मार्गे वाहतुक सुरु आहे.

गगनबावडा- प्रजिमा 19 रा.मा. 193 पासून बाजार भोगाव काऊरवडी, किसरुल, पिसात्री, कोलिक पडसाली रस्ता प्रजिमा 19 वर कासारी नदीचे 4 फुट पाणी आल्याने वाहतुक बंद असून पर्यायी मार्ग उपलब्ध नाही.

गगनबावडा- प्रजिमा 19 रा.मा. 193 पासून बाजार भोगाव काऊरवडी, किसरुल, पिसात्री, कोलिक पडसाली रस्ता प्रजिमा 19 वर मानवाड गावाजवळ पाणी आल्याने वाहतुक बंद पर्यायी मार्ग उपलब्ध नाही.

गगनबावडा- प्रजिमा 19 रा.मा. 193 पासून बाजार भोगाव काऊरवडी, किसरुल, पिसात्री, कोलिक पडसाली रस्ता प्रजिमा 19 वर जांभळी नदीचे 3 फूट पाणी आल्याने वाहतुक बंद पर्यायी मार्ग उपलब्ध नाही.

गगनबावडा- प्रजिमा 18 वरील रा.मा.क्र. 177 पासून कोपार्डे, पडळ, माजगाव, पोर्ले ते रा.मा.क्र. 191 ला मिळणारा प्र.जि.मा.क्र. 18 वर माजगाव पुल ॲप्रोच वर 4 फूट कासारी नदीचे पाणी आल्याने वाहतुक बंद असून पर्यायी तिरपण, कोतोली मार्गे वाहतुक सुरु आहे.

चंदगड- प्रजिमा 66 वरील रा.मा.क्र. 180 पासून कानूर, कुरणी, गवसे, इब्राहिमपूर, अडकूर, रामा क्र. 189 ला मिळणारा प्रजिमा क्र. 66 वर नांदुरे पुलावर 2 फूट पाणी आल्याने वाहतुक बंद पर्यायी रामा 180 ते कुरणी, गवसे, इब्राहिमपूर, अडकुर प्रजिमा 66 मार्गे वाहतुक सुरु आहे.

चंदगड- प्रजिमा 71 वरील रा.मा.क्र. 187 पासून गुडवळे, खामदळे, हेरे, सावर्डे, कोळींद्रे, शिपूर, नांदवडे, करजगांव, हलकर्णी ते रामा क्र. 180 ला मिळणारा प्रजिमा क्र. 71 वर करंजगाव पूल किमी 11/400 वर 2 फुट पाणी आल्याने वाहतुक बंद पर्यायी प्रजिमा 71 ते करंजगांव ग्रामा 95 ते प्रजिमा 76 ते रामा 189 मार्गे हेरे सावर्डे, नांदवडे प्रजिमा 71 मार्गे वाहतुक सुरु आहे.

चंदगड- प्रजिमा 67 वरील रामा क्र. 180 पासून पाटणे फाटा माणगाव, शिवणगे, म्हाळेवाडी, धुलेवाडी, निटटूर, कोवाड प्रजिमा 61 ला मिळणारा प्रजिमा क्र. 67 वर 2 फूट पाणी आल्याने वाहतुक बंद पर्यायी रामा 180 ते तांबुळवाडी, बागिलगे, डुक्करवाडी, माणगाव, ईजिमा क्र. 191 मार्गे वाहतुक सुरु आहे.

गडहिंग्लज- प्रजिमा 64 वरील रामा क्र. 61 पासून श्रृंगारवाडी, वाटंगी, अर्जुनवाडी, कानडेवाडी, सांबरे, मलतवाडी, निटूर, प्रजिमा क्र. 67 ला मिळणारा प्रजिमा क्र. 64 वर घटप्रभा नदीवर बंधाऱ्यावर 3 फूट पाणी आल्याने बॅरीकेटींग लावून वाहतुक बंद पर्यायी नेसरी, हडलगे, सांबरे मार्गे वाहतुक सुरु आहे.

गडहिंग्लज- प्रजिमा 80 वरील प्रजिमा 56 पासून जरळी, दुंडगे, हासूचंपू ते राज्यहद्दीपर्यंत प्रजिमा 80 वर घटप्रभा नदीवर बंधाऱ्यावर 3 फूट पाणी आल्याने बॅरीकेटींग लावून वाहतुक बंद पर्यायी गडहिंग्लज, गजरगाव, महागाव मार्गे वाहतुक सुरु आहे.

गडहिंग्लज- प्रजिमा 56 वरील भडगाव, जरळी, मुगळी, नूल, खणदाळ, नांगनुर किमी 18/ 900 वर रस्त्यावर 3 फूट पाणी आल्याने पर्यायी कडलगे, चिकालगुड, संकेश्वर मार्गे वाहतुक सुरु आहे.

गडहिंग्लज- प्रजिमा 56 वरील भडगाव, जरळी, मुगळी, नूल, खणदाळ, नांगनुर किमी 18/ 900 वर रस्त्यावर 3 फूट पाणी आल्याने पर्यायी अंतर्गत रस्ता खणदाळ

गडहिंग्लज-प्रजिमा 59 वरील कवळीकट्टी, तेरणी, हलकर्णी ते रामा 201 ते चंदनकुड, इदरगुच्ची, कडलगी, अरळगुंडी प्रजिमा 56 ला मिळणारा प्रजिमा 59 किमी 20/500 ते 21/100 वर रस्त्यावर 2 फुट पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. पर्यायी  कडलगे, चिकालगुड, संकेश्वर मार्गे वाहतूक सुरु आहे.

शाहूवाडी -प्रजिमा 1 वर आरळे (जिल्हा सांगली) ते शित्त्तुर तर्फ वारुण, उद्गिरी प्रजिमा 2 ला मिळणारा रस्ता प्रजिमा क्र. 1 वर (आरळा पुल) मध्ये वारणा नदीवरील पुलावर पाणी वाढत असल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. पर्यायी उखळू ते जिल्हा हद्द मार्गे वाहतूक सुरु आहे.

शाहूवाडी -प्रजिमा 3 वर राज्यमार्ग क्र. 150 पासून तुरुकवाडी, कोतोली, रेठरे, गोंडोली, सोंडोली, खेडे शित्तूर तर्फ वारुण प्रजिमा क्र. 1 ते उखळू सांगली जिल्हा हद्द प्रजिमा क्र. 3 वर नदीवरील पाणी वाढत असल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. पर्यायी विरळे, जांभूर ते सोंडोली मार्गे वाहतूक सुरु आहे.

शिरोळ –  प्रजिमा 103 वरील प्रजिमा 23 ते आलास, अकिवाट, गुरुदत्त साखर कारखाना, टाकळी ते प्रजिमा 38 ला मिळणारा प्रजिमा 103 वर 2 फुट पाणी आल्याने वाहतुकीसाठी रस्ता बंद करण्यात आला आहे. नांदणी, जयसिंगपूर, शिरोळ मार्गे वाहतूक सुरु आहे.

भुदरगड – प्रजिमा 48 वरील रामा 189 कूर, कोनवडे, म्हसवे राज्यमार्ग क्र. 179 ला मिळणारा प्रजिमा क्र. 48 वर म्हसवे ते दारवाड दरम्यान रस्त्यावर पाणी आल्याने रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला असून पर्यायी मार्ग नाही.

राधानगरी-  प्रजिमा 29 वरील रामा क्र. 193 यवलुज, दोनवडे ते रामा 177 पुढे बालिंगे, महेपाटी, बिड, शिरोली, सडोली दुमाला, चाफोडी, गरजण, काते, चांदे, धामोड, शिरगाव, तारळे खु., पडळी, कारीवडे, ओलवन, तारळे खुर्द, तारळे, पिरळ, पडळी, कारीवडे, दिगस, ओळवण ते रामाक्र. 178 ला मिळणारा प्रजिमा 29 वर सावर्धन गावाजवळ रस्त्यावर पाणी आल्याने रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. पर्यायी मिसाळवाडी, जोंधळेवाडी, दुर्गमानवाड, तारळे प्रजिमा 41 मार्गे वाहतूक सुरु आहे.

शाहुवाडी- प्रजिमा 4 वरील राष्ट्रीय महामार्ग क्र. 204 पासून येळाणे, कोपार्डे जवळून शिरगांव, सौते, शिंपे, सरुड ते सागाव जिल्हा हद्दीपर्यंत प्रजिमा क्र. 4 वर  येळाणे कोपार्डे रस्त्यावर पाणी आल्याने रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला आहे.  पर्यायी विरळे, जांभूर ते सोडोली मार्गे वाहतूक सुरु आहे.

शिरोळ-  प्रजिमा 84 वरील प्रजिमा क्र. 22 पासून खोतवाडी, तारदाळ, प्ररामा क्र. 6 पासून तमदलगे, निमशिरगांव, जैनापूर, उदगांव, प्ररामा क्र. 6 ला मिळणारा प्रजिमा क्र. 84 वर उदगांव ओढ्यावर पाणी आल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पर्यायी जयसिंगपूर, उदगांव मार्गे वाहतूक सुरु आहे.

आजरा – प्रजिमा 82 वरील रामा 188 पासून भादवण, पेंद्रेवाडी, कोवाडे, मलिंगे, कागीनवाडी, कोळींद्रे प्रजिमा 62 ला मिळणारा प. 82 वर भादवण बंधाऱ्यावर पाणी आल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. प्रजिमा 82 पेद्रेवाडी गावाजवळ ओढ्यावर पाणी आल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पर्यायी हाजगोळी मार्गे आजरा हत्तीवडे, कानोली मार्गे वाहतूक सुरु आहे.

आजरा – प्रजिमा 82 वरील रामा 188 पासून भादवण, पेंद्रेवाडी, कोवाडे, मलिंगे, कागीनवाडी, कोळींद्रे प्रजिमा 62 ला मिळणारा प. 82 वर पेंद्रेवाडी गावाजवळ ओढयावर पाणी आल्याने रस्ता बंद पर्यायी पर्यायी हाजगोळी मार्गे आजरा हत्तीवडे, कानोली मार्गे वाहतूक सुरु आहे.

शाहुवाडी – प्रजिमा 119 वर राम मा क्र. 166 ते शाहुवाडी, कोळगाव, टेकोली, पणुंद्रे, रा.मा. 150 ला मिळणारा रस्ता प्रजिमा 199 वर शाळी नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पर्यायी मार्ग नाही.

आजरा- प्रजिमा 83 वरील रा.मा. 188 पासून बेळगुदी, इंचनाळ, हारुर रामा 201 ला मिळणारा प्रजिमा क्र. 83 वर  7/800 गजरगाव बंधाऱ्यावर पाणी आल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पर्यायी मलिग्रे, कोवाडे, पेद्रेवाडी, भादवण मार्गे वाहतूक सुरु आहे.

हातकणंगले – प्रजिमा 10 वरील रामा 199 पासून कुंभोज ते आष्टा जिल्हा हद्दीपर्यंत प्रजिमा क्र. 10 वर  वारणा नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पर्यायी कुंभोज, दोनोळी, जयसिंगपूर मार्गे वाहतूक सुरु आहे.

राधानगरी- प्रजिमा 113 वरील इजिमा 59 पासून बारडवाडी,तळाशी, चंद्रे, कसबा वाळवे, पिराचीवाडी, सावर्डे बु. प्रजिमा 113 वर चंद्रे ते वाळवे दरम्यान किलोमीटर 7/100 मध्ये बंधाऱ्यावर पाणी आल्याने वाहतुक बंद पर्यायी रस्ता बिद्री ते वाळवे मार्गे वाहतुक सुरु आहे.

राधानगरी- प्रजिमा 35 वरील प्रजिमा क्र. 29 पासून आरे, सडोली खालसा, हिरवडे, हासूर दुमाला, राशिवडे बु., शिरगांव, प्रजिमा 29 ला मिळणारा प्रजिमा क्र. 35 वर रस्त्यावर 1 फुट पाणी आल्याने वाहतुक बंद पर्यायी रस्ता तारळे, खिंडी व्हरवडे मार्गे वाहतुक सुरु आहे.

शाहुवाडी- प्रजिमा 2 वरील राष्ट्रीय महामार्ग क्र. 204 पासून निळे, करंगुळे, अलतुर, पुसार्ले, भेंडवडे, प्रजिमा क्र. 1 ला मिळणारा प्रजिमा क्र. 2 वर कडवी पूल मध्ये कडवी नदीवरील पुलावर पाणी वाढत असल्याने वाहतुक बंद पर्यायी लाळेवाडी प्रजिमा 116 वरुन करुंगळे पर्यंत वाहतुक सुरु आहे.

शाहुवाडी- प्रजिमा 116 वरील रामा 150 पासून कडवे, करुंगळे इजिमा 194 ला मिळणारा रस्ता प्रजिमा 116 वर (पोटफुगी पुल) मध्ये पोटफुगी नदीवरील पुलावर पाणी वाढत असल्याने वाहतुक बंद पर्यायी मार्ग नाही.

शिरोळ- प्रजिमा 33 वरील प्रजिमा 38 पासून टाकळी, दानवाड ते राज्य हद्दीपर्यंत प्रजिमा क्र. 33 वर दानवाड पुलावर 1 फुट पाणी आल्याने वाहतुक बंद पर्यायी मार्ग नाही.

शिरोळ- प्रजिमा 15 वरील प्ररामा 6 पासून निमशिरगांव दानोळी, कवठेसार ते जिल्हा हद्द प्रजिमा क्र. 15 वर रस्त्यावर 1 फुट पाणी आल्याने वाहतुक बंद पर्यायी मार्ग दानोली, कुंभोज, कवठेसार मार्गे वाहतुक सुरु आहे.

राधानगरी- प्रजिमा 98 वरील रामा 178 पासून सरवडे, मालवे, तुरंबे, तळाशी, माजगांव, ठिकपुर्ली रस्ता प्रजिमा 98 वर दुधगंगा नदीवर तुरंबे, मालवे दरम्यान पाणी आल्याने वाहतुक बंद पर्यायी तुरंबे, मुदाळतिट्टा sh 189 वरुन सरवडे मार्गे वाहतुक सुरु आहे.

हातकणंगले- प्रजिमा 110 वरील रामा क्र. 177 पासून (हुपरी) ते इंगळी ते चंदूर ते इचलकरंजी ते रामा 200 रस्ता प्रजिमा क्र. 110 वर जुना चंदुर रोड येथे रस्त्यावर पाणी आल्याने रस्ता बंद पर्यायी चंदुर, आभार फाटा, इचलकरंजी मार्गे वाहतुक सुरु आहे.

हातकणंगले- प्रजिमा 111 वरील इचलकरंजी, रुई, चंदुर ते हुपरी रस्ता प्रजिमा क्र. 111 वर रस्त्यावर पाणी आल्याने वाहतुक बंद पार्यायी रुई, आभार फाटा, चंदुर मार्गे वाहतुक सुरु आहे.

करवीर- प्रजिमा 27 वरील रामा क्र. 177 पासून कुडीत्रे फॅक्टरी, सांगरुळ, बोलोली, उपवडे प्रजिमा क्र. 27 वर रस्त्यावर पाणी आल्याने रस्ता वाहतुकीस बंद पर्यायी आमशी, पासारडे, उपवडे मार्गे वाहतुक सुरु आहे.

करवीर- प्रजिमा 27 वरील रामा क्र. 177 पासून कुडीत्रे फॅक्टरी, सांगरुळ, बोलोली, उपवडे प्रजिमा क्र. 27 वर पुलाच्या जोडरस्त्यावर पाणी आल्याने रस्ता बंद पर्यायी मार्ग सांगरुळ, आमशी, महारुळ, बहिरेश्वर, बीडशेड मार्गे वाहतुक सुरु आहे.

करवीर- प्रजिमा 37 वरील प्रजिमा क्र. 29 पासुन शिरोली दुमाला, बाचणी सडोली खालसा, हळदी, कुर्डू, इस्पुर्ली, हळदी, नांगाव, नंदगांव, एकोंडी, व्हन्नुर ते रामा क्र. 195 ला पिंपळगाव नजिक मिळणारा प्रजिमा क्र. 37 वर रस्त्यावर पाणी आल्याने वाहतुक बंद पर्यायी हासूर, राशिवडे, परिते मार्गे वाहतुक सुरु आहे.

शिरोळ- प्रजिमा 93 वरील राममा.क्र. 166 ते चिपरी, जैनापूर, कोथळी ते जिल्हाहद्द हरीपूर ते रामा 154 रस्ता प्रजिमा 93 वर हरीपूरमध्ये पाणी आल्याने रस्ता वाहतुकीस बंद पर्यायी जयसिंगपूर, उदगाव मार्गे वाहतुक सुरु आहे.

करवीर- प्रजिमा 30 वरील रामा क्र. 196 पासून कोल्हापूर, आयटीआय पाचगाव, गिरगांव, वडगाव, नंदगाव, खेबवडे ते बाचणी प्रजिमा क्र. 30 वर रस्त्यावर पाणी आल्याने वाहतुक बंद पर्यायी खेबवडे, बामणी, नदीकिनारा, कागल मार्गे वाहतुक सुरु आहे.

हातकणंगले- प्रजिमा 21 वरील राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 पासून विकासवाडी, हलसवडे, सांगवडे, पट्टणकोडोली, इंगळी, रुई, कबनूर रामा 200 ला मिळणारा प्रजिमा क्र. 21 वर  पंचगंगा नदीचे रुई गावात रस्त्यावर पाणी आल्याने वाहतुक बंद पर्यायी अतिग्रे, शिरोली, उचगाव मार्गे वाहतुक सुरु आहे.

राधानगरी- प्रजिमा 34 वरील रामा क्र. 177 पासून शेनवडे, अंदूर, धुंदवडे, चौधरवाडी, म्हासुर्ली, कोते, चांदे, राशिवडे बुद्रुक, परिते रामा क्र. 189 ला मिळणारा रस्ता प्रजिमा क्र. 34 वर राशिवडे गावाजवळ नदीच्या फुगवट्याचे 2 फूट पाणी आल्याने वाहतुक बंद पर्यायी तारळे, खिंडी व्हरवडे मार्गे वाहतुक सुरु आहे.

शिरोळ- प्रजिमा 14 वरील जयसिंगपूर रेल्वेस्टेशनपासून उदगाव, चिंचवाड, अर्जुनवाड, घालवाड, कुटवाड, कनवाड, हासूर, शिरटी, शिरोळ राज्यमार्ग क्र. 153 ला मिळणारा प्रजिमा क्र. 14 वर चिंचवाड गावाजवळ पाणी आल्याने रस्ता वाहतुकीस बंद पर्यायी उदगांव, शिरोळ, अर्जुनवाड मार्गे वाहतुक सुरु आहे.

About Belgaum Varta

Check Also

महामेळाव्यास परवानगी नाकारली तर कर्नाटकातून येणाऱ्या वाहनांना महाराष्ट्र सीमेवर अडवू

Spread the love  शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा इशारा कोल्हापूर : बेळगाव येथे ९ डिसेंबर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *