बेळगाव : येळ्ळूर येथील महाराष्ट्र चौक (लक्ष्मी स्थळ) येथील 30 एक वर्षे वादात असलेल्या सार्वजनिक लक्ष्मी स्थळाचा आज येळ्ळूर ग्राम पंचायतच्या वतीने निकाल लावण्यात आला.
येळ्ळूर ग्राम पंचायतचे अध्यक्ष सतीश पाटील असताना या जागेच्या प्रश्नाला स्थानिक लोकांना नोटीसा पाठवून त्यांच्या जागेचे कागद पत्र मागून घेऊन स्थळाची पाहणी करून तेथील सर्व घरांची मोजणी करून त्यांची हद्द ठरविण्यात आली होती. त्याप्रमाणे येळ्ळूर ग्राम पंचायत व ग्रामस्थांच्या वतीने आज दिनांक 1/8/2024 रोजी त्या स्थानिक जागेच्या मालकांना बोलवून पुन्हा एकदा आज मोजणी करून लक्ष्मी स्थळाची जागा सर्वानुमते हद्द करून गेल्या कित्येक वर्षांचा हा वैचारिक वाद येळ्ळूर ग्राम पंचायतचे माजी अध्यक्ष आणि त्या भागाचे विद्यमान सदस्य सतीश पाटील यांनी स्वतः पुढाकार घेऊन त्यांच्यासोबत ग्रामपंचायत अध्यक्ष लक्ष्मी मासेकर, उपाध्यक्ष प्रमोद पाटील तसेच ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, पीडिओ यांनी त्या जागेच्या मालकांची समजूत घालून हा वाद मिटवण्यासाठी अतोनात प्रयत्न केले.
ग्राम पंचायत व ग्रामस्थ, गावं कमिटी, लक्ष्मी कमिटी यांना आज फार मोठे यश आले. यासाठी देसाई कुटुंब आणि पाटील कुटूंबीय यांनी निःस्वार्थी भावनेने अगदी मोठ्या मनाने सहकार्य केले. त्याबद्दल ग्राम पंचायतच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. तसेच या कार्यासाठी ग्राम पंचायत पीडिओ यांचे सुध्दा फार मोठे मोलाचे सहकार्य लाभले.
यावेळी येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्ष लक्ष्मी मासेकर, उपाध्यक्ष प्रमोद पाटील, माजी अध्यक्ष विद्यमान सदस्य सतीश पाटील, सदस्य शशिकांत धूळजी, अरविंद पाटील, शिवाजी नांदूरकर, रमेश मेनसे, परशराम परीट, जोतिबा चौगुले, राजू डोन्यांण्णावर, राकेश परीट, प्रदीप सुतार, विलास बेडरे, दयानंद उघाडे, सदस्या शालन पाटील, वनिता परीट, पीडिओ पूनम गडगे, सेक्रेटरी सदानंद मराठे तसेच देसाई परिवार, पाटील परिवार, ग्रामस्थ कमिटी, स्थानिक नागरिक व ग्राम पंचायत कर्मचारी उपस्थित होते.