सुनावणी न करण्याची केली होती विनंती
बंगळूर : लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने मुडा घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात दाखल केलेल्या खासगी तक्रारीवर सुनावणी न घेण्याची विनंती करणारी आलम पाशा यांनी दाखल केलेली अंतरिम याचिका फेटाळून लावली.
लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयात मुडा घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात स्नेहमाई कृष्णा यांनी दाखल केलेल्या खासगी तक्रारीवर सुनावणी सुरू आहे.
स्नेहमाई कृष्णातर्फे ज्येष्ठ वकील लक्ष्मी अय्यंगार यांनी आलम पाशा यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आक्षेप घेतला. न्यायालयाचा वेळ वाया जात असल्याने याचिका फेटाळण्यात यावी, असा युक्तिवाद त्यांनी केला.
आलम पाशा यांच्या युक्तिवादावर न्यायाधीश संतोष गजानना भट यांनी नाराजी व्यक्त केली असून याचिकाकर्ता आलम पाशा तक्रार दाखल करण्याची परवानगी मागत नाही. त्याऐवजी, ते कायदेशीर प्रक्रियेला स्थगिती देण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि त्यामुळे अलमपाशा यांचा अर्ज फेटाळण्याचा अधिकार आहे, असे आदेश दिले.
तसेच याचिकाकर्ते आलम पाशा यांच्या विरोधात संतप्त झालेले न्यायमूर्ती यांनी तुम्ही कोणत्या कायद्यानुसार याचिका दाखल केली? असा सवाल केला. आलमपाशा यांनी जनतेच्या हितासाठी अर्ज दाखल केल्याचा युक्तिवाद केला. स्नेहमाई कृष्णासाठी लक्ष्मी अय्यंगार यांनी पाशाच्या युक्तिवादावर आक्षेप घेतला आणि असा युक्तिवाद केला की या टप्प्यावर असंबंधित व्यक्तीचे ऐकले जाऊ नये आणि न्यायालयाचा वेळ वाया घालवल्याबद्दल दंड ठोठावला जावा.
युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने कृष्णाच्या याचिकेची सुनावणी २० ऑगस्ट आणि अब्राहमच्या याचिकेची सुनावणी २१ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली.