बेळगाव : येळ्ळूर येथील श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या सोसायटीची स्थापना करण्यात आली. या आशयाचे पत्र सहकार खात्याकडून दिनांक 30-1 -2024 रोजी Reg No.DRL/RSR/UOG/55826/2023-24 यानुसार प्राप्त झाले.
बुधवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी या संदर्भात संस्थेच्या कार्यालयात श्री. वाय. एन. मजुकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी सोसायटीचे अध्यक्ष म्हणून नरेंद्र मजूकर यांची तर उपाध्यक्ष म्हणून ज्ञानेश्वर विद्यालय लोकोळीचे मुख्याध्यापक एस. एम. येळ्ळूरकर यांची निवड झाली तर रवळनाथ हायस्कूल शिवठाणचे क्लर्क गावडा यांची सचिव म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी बोलताना संस्थापक अध्यक्ष वाय. एन. मजुकर म्हणाले की, सहकारी संस्था या सचोटीवर चालत असतात या संस्थेत कर्मचाऱ्यांना बँकेप्रमाणे सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात बचत व मुदत ठेवी सोसायटीमध्ये ठेवाव्यात व सोसायटीच्या वाटचालीस हातभार लावावा.
यावेळी बोलताना संस्थेचे सचिव प्रसाद मजुकर म्हणाले की, संस्थापक वाय. एन. मजुकर यांचे स्वप्न होते की, आपल्या कर्मचाऱ्यांच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी सोसायटीची स्थापना करण्याची गरज आहे त्यानुसार सर्व सदस्यांनी मिळून सोसायटी भरभरटीला न्यावी असे उद्गार काढले. तसेच सल्लागार आर. बी. पाटील यांचेही मार्गदर्शन पर भाषण झाले.
यावेळी नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड करून सत्कार करण्यात आला. सत्कारला उत्तर देताना अध्यक्ष नरेंद्र मजुकर व उपाध्यक्ष एस. एम. येळ्ळूरकर म्हणाले की, माझ्यावर आपण सर्वांनी विश्वास ठेवून जबाबदारी दिली ती मी यशस्वीपणे पार पाडीन.
यावेळी सर्वांच्या उपस्थितीत संस्थेच्या कामकाजाची रूपरेषा ठरविण्यात आली यावेळी सोसायटीचे संचालक आय. बी. राऊत, जे. एम. पाटील, ए. डी. धामणेकर, पी. ए. पाटील, ए. एम. पाटील, एन. के. पाटील, ए. बी. कांबळे, संचालिका श्रीमती एस. व्ही. पाटील, श्रीमती ए. एम. लोहार, श्रीमती व्ही. पी. जिवाई यांच्यासह सल्लागार आर. बी. पाटील, के. आर. पाटील, एम. आर. अनगोळकर, ए. एस. पाटील तसेच टी. एस. बोकडेकर, एम. एम. डोंबले, वाय. बी. कंग्राळकर, एल. एस. बांडगे, श्रीमती स्नेहल मजुकर, श्रीमती यू. व्ही. सावंत आदी शिक्षक उपस्थित होते.