आजरा : प्राथमिक विद्यामंदिर मुमेवाडी ता. आजरा येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. वैभव कांबळे होते. यावेळी तालुक्यातील पहिलाच उपक्रम म्हणून आदर्श व गुणवंत विद्यार्थी हा पुरस्कार कुमारी प्रांजल विजय सावेकर या विद्यार्थिनीला देण्यात आला. त्यावेळी सर्व पालकांनी या उपक्रमाचे कौतुक केले. शाळेमध्ये जर बदल घडवायचा असेल तर शिक्षकांच्या बरोबरीने पालकांनी सुद्धा या सर्व प्रकियेमध्ये उत्स्फुर्तपणे आपला सहभाग दिला पाहिजे. आपल्या पाल्याच्या प्रगतीविषयी वेळोवेळी शिक्षकांशी चर्चा केली पाहिजे असे मत अध्यक्ष यांनी मांडले. त्याच बरोबर शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षक याच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती पालकांना देण्यात आली. व या उपक्रमांचा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नक्कीच फायदा होईल असे मत शिक्षकांनी मांडले. यावेळी हिमविर व माजी विद्यार्थी आ.टी बि. पी. कमांडो श्री. प्रवीण पाटील यांचा व सर्व शिक्षक व अंगणवाडी सेविका मदतनिस यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष श्री. रामदास मोरवाडकर, विद्यार्थी व पालक याची मनोगते झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक श्री. पुंडपळ सर यांनी केले तर आभार मुख्यध्यापक श्री.के. टी. गुरव सर यांनी मानले.