निपाणी (वार्ता) : सर्वसामान्य नागरिक आणि कामगार वर्गाला अल्पदरात नाष्टा व जेवन मिळावे, यासाठी बोरगाव येथे इंदिरा कॅन्टीन उभारण्यात येत आहे. या इंदिरा कॅन्टीनचे काम सुरू आहे. नगरपंचायत अधिकाऱ्यांसह नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवकांनी या कामाची पाहणी केली.
राज्यात काँग्रेस सत्ता आल्यानंतर ‘हसिवूमुक्त कर्नाटक’ या योजनेतून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी इंदिरा कॅन्टीन उभारण्याचा प्रस्ताव मांडला. सीमा भागातील बोरगाव येथेही या इंदिरा कॅन्टीला मंजुरी मिळाली असून सध्या या इंदिरा कॅन्टीनचे काम चालू आहे. किचन रूम, स्टोअर रूम, शौचालय, शुद्ध पाणी घटक काउंटर असे विविध कामे सुरू आहेत.
सहकाररत्न उत्तम पाटील यांनी, बोरगावात इंदिरा कॅन्टीन सुरू होत असल्याने परिसरातील सर्वसामान्यांना अल्प दरात जेवण मिळणार आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या महत्त्वकांक्षी योजनेतील ही एक योजना असून त्यांच्यामुळे विविध योजनेचा मिळत असल्याचे सांगितले
यावेळी नगराध्यक्ष पिंटू कांबळे, उपनगराध्यक्षा भारती वसवाडे, नगरसेवक अभयकुमार मगदूम, तुळशीदास वसवाडे, माजी नगराध्यक्ष संगाप्पा ऐदमाळे, मुख्याधिकारी स्वानंद तोडकर, महसूल निरीक्षक संदीप वाईंगडे, प्रथम दर्जा सहाय्यक राहुल गुडिनकर, द्वितीय श्रेणी सहाय्यक पोपट कुरळे, विजय चौगुला उपस्थित होते.