बेळगाव : बसवान गल्ली बेळगाव येथील बेळगावची ग्रामदेवता महालक्ष्मी मंदिरात मंगळवारी सायंकाळी सात वाजता बेळगावच्या राजाच्या पदाधिकाऱ्यांकडून महाआरती व महापूजा करण्यात आली. चवाट गल्लीतील बेळगावचा राजा गणेश उसत्व निर्विघ्नपणे पार पाडल्याबद्दल बसवान गल्ली येथील महालक्ष्मीचे महाआरती व महापूजन आयोजन केले होते. याप्रसंगी देवीला साडी चोळी व लाडूचा प्रसाद चढावा चढवून महाआरती करण्यात आली. एकंदर चवाट गल्लीतील गणेश उत्सव प्रति वर्षाप्रमाणे भक्तीभावाने व उत्साहात पार पडला. चवाट गल्लीच्या परंपरेनुसार अनेक विधी या गणेशोत्सवात आयोजित केले होते. या उसत्वात नागरिकासह विद्यार्थी महिला मंडळ राजकीय नेते मोठ्या संख्येने या गणेश उत्सवात सहभागी झाले होते. चवाट गल्लीच्या आराध्य दैवत जोतिबा तसेच महालक्ष्मी देवी हिच्या आशीर्वादाने हा सोहळा निर्विघ्नपणे पार पाडला. या भावनेतूनच महालक्ष्मीची ओटी भरण्याचा हा सोहळा करण्यात आला. यावेळी गल्लीतील गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.