बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित नेताजी हायस्कूल सुळगे (ये) येथे जिल्हा पंचायत बेळगाव यांच्या वतीने स्वच्छता सेवा अभियान कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पंचायत अधिकारी श्रीमती नीलम्मा कमते, श्री. विजय असोदे व सुळगे ग्रामपंचायत सेक्रेटरी श्री. दुर्गाप्पा तहसीलदार उपस्थित होते. तर प्रमुख अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री टी वाय भोगन लाभले. प्रारंभी श्री. एस. एस. केगेरी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व ओळख करून दिली. तर प्रमुख उपस्थित अतिथी श्रीमती नीलम्मा कमते यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छते विषयी मार्गदर्शन करून शपथ घ्यावयास लावली. यावेळी मुख्याध्यापक श्री. टी. वाय. भोगन यांनी विद्यार्थ्यांना आरोग्यबद्दल घ्यावयाचे दक्षता याबद्दल माहिती दिली. यावेळी सहशिक्षक श्री. एम. पी. कंग्राळकर, श्री. जे. जे. पाटील, सौ. एस. वाय. व्हडेकर, सौ. आर. ए. कंग्राळकर व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.