बागेवाडी महाविद्यालयात जयंती
निपाणी (वार्ता) : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री या महापुरुषांनी आदर्श जीवन जगले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे प्रतिमा पूजन करून चालणार नाही. त्यांनी जे सत्य अहिंसा आणि प्रामाणिकपणा चांगले कार्य आपल्यापर्यंत पोहोचविले. ते आपण पाळले पाहिजे, त्याचा स्वीकार करून त्यांचे आदर्श जीवन आपल्या जीवनात अंगीकारले पाहिजे, असे मत विधान परिषदेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि के.एल.ई. संस्थेचे संचालक महांतेश कवटगीमठ यांनी व्यक्त केले.
महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त के. एल. ई. संस्थेच्या येथील जी. आय. बागेवाडी कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात बुधवारी (ता.२) आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
प्रारंभी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री या महापुरुषाच्या प्रतिमेला पूजन झाले. एनएसएस स्वयंसेवक, एनसीसी कॅडेट, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी श्रमदान करून स्वच्छता मोहीम राबवली. यावेळी विद्यासंवर्धक मंडळाचे उपाध्यक्ष पप्पु पाटील, संचालक समीर बागेवाडी, व्ही. एस. एम. ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनचे सीईओ डॉ. सिद्धगौडा पाटील, उपप्राचार्य डॉ. रवींद्र खराबे, एनएसएस अधिकारी डॉ. श्रीपती रायमाने, प्रा.सुधीर कोठीवाले, डॉ. अशोक राठोड, प्रा.आनंदा केंचक्कनवर, प्रा. अश्विनी किल्लेदरा पंकजा बकाले, डॉ. टी. व्ही. नंदी, प्रा. शशिधार कुंभार, फिजिकल डायरेक्टर प्रा. सिद्दू उदगट्टी, प्रा. व्ही. बी. सुतार, प्राशिवलिंग नायक, राहुला मुरदंडे उपस्थित होते. प्राचार्य महांतेश हुरळी यांनी स्वागत केले. डॉ. अतुलकुमार कांबळे यांनी आभार मानले.