बेळगाव : उद्योजक संतोष पद्मन्नावर यांच्या हत्येप्रकरणी माळमारुती पोलिसांना रात्री उशिरा दोन आरोपींना अटक केली आहे.
बेंगळुरू स्थित शोभित गौडा आणि आणखी एका आरोपीला पोलिसांनी हुबळी येथे अटक केली आणि बेळगावला आणले, तेथे वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
उमाचा फेसबुक फ्रेंड असलेल्या शोभित गौडाला उमाने ९ तारखेला फोन करून सर्व काम उरकले. आपल्याला धाडस होत नाही, तू ये असे बोलावून घेतले आणि तिने तिच्या पतीला झोपेच्या गोळ्या देऊन त्याचा श्वास गुदमरून जीवे मारण्याचा प्रयत्न केला, पण तो मेला नाही. अखेर अटक करण्यात आलेल्या आरोपींनी आपल्या मित्रांच्या मदतीने उमाने संतोषची हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. काही क्षणातच पोलीस हत्येतील मुख्य आरोपी उमा हिला अटक करण्यासाठी मयत संतोषच्या अंजनेय नगर येथील घरी जाणार आहेत. बेळगाव शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मारबानयांग यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले. मृत संतोषच्या मुलीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे माळमारुती सीपीआय कालिमिर्ची यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आरोपीना अटक करण्यात यश मिळविले.