४४ कोटी रुपये दंड
बंगळूर : कारवारमधील काँग्रेसचे आमदार सतीश सैल यांना बेलेकेरी खनिज गायब प्रकरणी लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने आज तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. त्याना आता ७ वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा भोगावी लागणार असून न्यायालयाने त्याना ४४ कोटीचा दंडही ठोठावला आहे.
बेलेकेरी खनिज गायब प्रकरणी लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने सैल यांना दोषी ठरवून दोन दिवसापूर्वीच सर्व गुन्हेगारांना तात्काळ ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सैल यांना न्यायालयाच्या आवारात ताब्यात घेतले होते.
११,३१२ मेट्रिक टन जप्त खनिजाची परवानगी न घेता वाहतूक करण्यात आली. या प्रकरणी याचिकेवर सुनावणी करणारे लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश संतोष गजानना भट यांनी महेश बिलिये, मल्लिकार्जुन शिपिंग आणि आमदार सतीश सैल यांना दोषी ठरवून शिक्षा राखून ठेवली होती. ती आज जाहीर करण्यात आली.
सतीश सैल याना फसवणुकीच्या गुन्ह्यात सात वर्षे, कट रचल्याप्रकरणी पाच वर्षे आणि चोरीच्या गुन्ह्यात तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याचवेळी न्यायालयाने मोठा दंड ठोठावला. न्यायालयाने त्याना ४४ कोटींहून अधिक दंड ठोठावला.
आमदारपद धोक्यात
नियमांनुसार, दोन वर्षांपेक्षा जास्त तुरुंगवासाची शिक्षा झाल्यास आमदाराची जागा गमवावी लागेल. अशा प्रकरणात सतीश साईल याना सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचे आमदार पद अपात्र ठरणार आहे. लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने आज एकूण ६ प्रकरणांमध्ये अंतिम आदेश दिला. बेलेकेरी खनिज गायब झाल्याप्रकरणी दाखल झालेल्या सहा गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या सीबीआयने आरोपपत्र दाखल केले होते. सीबीआय अधिकाऱ्यांनी आता आरोपींना न्यायालयाच्या आवारात अटक करून परप्पन येथील अग्रहार कारागृहात हलवले आहे.