Friday , November 8 2024
Breaking News

जिल्हा शरीरसौष्ठव असोसिएशनच्या माध्यमातून शरीरसौष्ठवपटूंना व्यासपीठ मिळणार : आर. एम. चौगुले

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव असोसिएशन अँड स्पोर्टस् या संघटनेच्या माध्यमातून दुर्लक्षित शरीरसौष्ठवपटूंना व्यासपीठ मिळणार आहे. काही वर्षांपूर्वी शरीरसौष्ठव स्पर्धा गाजवलेले माजी शरीरसौष्ठवपटू याठिकाणी उपस्थित असल्याने विशेष आनंद झाला. संघटनेच्या माध्यमातून स्थानिक शरीरसौष्ठवपटूंना मोठी झेप घेण्यास पोषक वातावरण नक्कीच निर्माण होईल, असे प्रतिपादन उद्योजक आर. एम. चौगुले यांनी केले.

गोवावेस येथील संत तुकाराम महाराज सांस्कृतिक भवनात बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव असोसिएशन अँड स्पोर्ट्स या संघटनेच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन, हनुमान व शिवपुतळा पूजन करण्यात आले. यावेळी चौगुले म्हणाले, मध्यंतरी संघटनेतर्फे शरीरसौष्ठव स्पर्धा बंद पडल्याने स्थानिक खेळाडूंचे नुकसान झाले. आता पुन्हा ही संघटना सक्रीय झाल्याने शरीरसौष्ठव या क्रीडाप्रकाराला ऊर्जितावस्था मिळणार असल्याचे सांगितले. यावेळी बेळगाव मर्चटस् सोसायटीचे चेअरमन नारायण किटवाडकर म्हणाले, संघटनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्यास संघटना शरीरसौष्ठवपटूंना प्रोत्साहन देत राहिल.

माजी नगरसेवक किरण परब यांनी बोलताना या संघटनेने ऑलिंपिकपर्यंत झेप घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करुन संघटनेला मदत सुपूर्द केली. यावेळी व्यासपीठावर जयभारत फाऊंडेशनचे अध्यक्ष बसनगौडा पाटील, महेश कुदळे, किशोर गवस, प्रणय शेट्टी, मराठा जागृती संघाचे गोपाळ बिर्जे, माजी उपमहापौर संजय शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी विचार व्यक्त केले. उपस्थित आजी-माजी शरीरसौष्ठवपटूंचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव असोसिएशन अँड स्पोर्टस संघटनेचे अध्यक्ष महेश सातपुते, उपाध्यक्ष सुनील चौधरी व बाबू पावशे, खजिनदार नारायण चौगुले, सरचिटणीस राजेश लोहार, सहसचिव अमित जडे व जितेंद्र काकतीकर, संयोजन सचिव अनिल आंबरोळे तसेच भारत बाळेकुंद्री, सुनील बोकडे, प्रेमकांत पाटील, चेतन ताशिलदार, विजय चौगुले, विनोद मेत्री, ऍड. सिद्धार्थराजे सावंत आदी पदाधिकारी व क्रीडाप्रेमी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

रुद्रण्णा यडवनावर आत्महत्या प्रकरण : बेळगावात भाजपाची जोरदार निदर्शने

Spread the love  बेळगाव : बेळगाव तहसीलदार कार्यालयाच्या दालनात आत्महत्या केलेल्या एसडीए कर्मचारी रुद्रण्णा यडवनावर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *