रुपाली निलाखे; कुर्ली हायस्कूलमध्ये व्यक्तिमत्त्व विकास मार्गदर्शन
निपाणी (वार्ता) : शैक्षणिक प्रवाहात विद्यार्थ्यांकडून असंख्य आव्हानांना सामोरे जाताना मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्याचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीवर परिणाम होत असून त्याबाबत विद्यार्थी व पालक यांनी सतर्क राहणे आवश्यक असल्याचे मत सुरत येथील प्रसिद्ध मनसोपचार तज्ञ रूपाली निलाखे यांनी व्यक्त केले. रयत शिक्षण संस्थेच्या कुर्ली येथील सिद्धेश्वर विद्यालयात मिनीगुरुकुल व इकोक्लब विभागामार्फत सर सी. व्ही. रामन जयंती प्रसंगी आयोजित व्यक्तिमत्त्व विकास मार्गदर्शन शिबिरात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस. एस. चौगुले होते.
विभाग प्रमुख एस. ए. पाटील यांनी स्वागत केले. सर सी. व्ही. रामन यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन झाले.
रुपाली निलाखे यांनी शालेय स्तरांवर अभ्यासाचे नियोजन, एकाग्रता, मेंदूचा विकास, प्राणायाम, ध्यानाचे महत्व, मानसिक आरोग्य विकास याबाबत सोदाहरण प्रायोगिक मार्गदर्शन केले.
यावेळी चेतन कासार, टी. एम. यादव, एस. एस. साळवी, के. ए. नाईक, एस. एस. पाटील, आर. ए. पाटील यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. एम. एस. वाळके यांनी सूत्रसंचालन केले. ए. ए. चौगुले यांनी आभार मानले.