बेळगाव : मराठी शाळा नं. 5 चव्हाट गल्ली येथे माजी विद्यार्थी संघ आयोजित श्री विश्वासराव धुराजी पुरस्कृत अक्षरलेखन सराव पाट्यांचे वितरण गुरुवार दिनांक 14/11/2024 रोजी मराठी शाळा नंबर 5 चव्हाट गल्ली येथे श्री. विश्वासराव धुराजी पुरस्कृत मुलांच्यासाठी अक्षरलेखन व अंक लेखन मराठी व इंग्रजी सराव पाट्यांचे वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी विद्यार्थी संघाचे सदस्य श्री. विश्वासराव धुराजी हे होते.
कार्यक्रमाच्या आधी माजी विद्यार्थी संघाचे सदस्य व व्यावसायिक स्वर्गीय उत्तम पोरवाल यांना श्रद्धांजली अर्पण केली.
याप्रसंगी बोलताना श्री. रवी नाईक यांनी सुंदर हस्ताक्षर हा एक दागिना असून मुलांनी आपल्या हस्ताक्षराकडे लक्ष दिले पाहिजे आणि हस्ताक्षरामुळे आपली अभिव्यक्ती ठळकपणे दिसून येते असे मत मांडले या उपक्रमातून मुलांना नक्कीच फायदा होईल असे त्यांनी सांगितले.
यानंतर बोलताना माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री. दीपक किल्लेकर यांनी या नावीन्यपूर्ण उपक्रमाचा परिचय करून दिला अक्षरलेखन सरावाचे महत्व, तसेच विद्यार्थ्यांनी या सर्व गोष्टीचा उपयोग करून आपली प्रगती करून घेतली तर असे विविध उपक्रम राबवण्यासाठी माजी विद्यार्थी संघालाही आवडेल असं त्यांनी विद्यार्थ्यांना आणि पालकांना आवर्जून सांगितले.
शाळेचे मुख्याध्यापक श्री. मुचंडीकर सर यांनी माजी विद्यार्थी संघामार्फत वेळोवेळी घेण्यात येणाऱ्या उपक्रमांविषयी गौरव उद्गार काढले. त्यांनी मुलांना अक्षर सराव करून हस्ताक्षर सुधारण्यासाठी सराव पाट्यांचे महत्व पालकांना सांगितले.
अध्यक्षीय भाषणात श्री. धुराजींनी आपल्या शाळेतील आठवणी सांगून, विद्यार्थ्यांनी सर्व सुविधांचा वापर करून व मनापासून अभ्यास करून आपली प्रगती करावी असा विचार मांडले.
सदर कार्यक्रमास श्री. अरुण कांगले यांच्यासह माजी विद्यार्थी सदस्य पालक बहुसंख्येने हजार होते
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. व्ही. व्ही. पाटील सर यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. ए. माळी सर यांनी केले.