बेळगाव : अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच राज्यातील वक्फ बोर्डाच्या निवडणुका बेळगावात शांततेत पार पडल्या. बेळगाव शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयात वक्फ निवडणुकीसाठी मतदान केंद्र उभारण्यात आले होते. बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, उपविभागीय अधिकारी श्रावण नाईक, उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी भेट देऊन पाहणी केली. बेळगाव, बेंगळुरू, म्हैसूर आणि गुलबर्गासह राज्यातील चार विभागांमध्ये मतदान झाले. खासदार, विधिमंडळ आणि बार कौन्सिल विभागातील जागांसाठी यापूर्वीच बिनविरोध निवडणूक पार पडली असून मूतवल्ली विभागातील दोन महत्त्वाच्या जागांसाठी काल मतदान झाले. मंत्री जमीर अहमद यांच्याच एका नातेवाईकाने सुन्नी जमातच्या प्रमुख मुस्लीम गुरूंविरोधात निवडणूक लढविल्याने याबाबत मुस्लीम समाजात संतापाची लाट उसळली आहे.
गुलबर्ग्याची हजरत खाज बंदे नवाज दर्गा हा दक्षिण भारतातील सर्वात मोठा दर्गा आहे. याशिवाय आणखी तीन उमेदवार रिंगणात आहेत. राज्य वक्फ सल्लागार समिती बेळगाव विभागाच्या पदाधिका-यांसाठी आज बेळगावात निवडणूक होत असून मतदारांनी आपला हक्क बजावला.
यावेळी आमदार आसिफ सेठ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, मंत्री जमीर अहमद हे अल्पसंख्याकांचे नेते असून राज्यात चांगले काम करत आहेत. आम्ही सर्व त्यांच्यासोबत आहोत, जमीर अहमद यांचा वक्फ बोर्ड निवडणुकीशी काहीही संबंध नाही. याचा राजकारणावर काहीही परिणाम होत नसल्याचे ते म्हणाले. भाजप नेहमीच विरोधात बोलतो. वक्फ मालमत्तेच्या विरोधात लढण्याऐवजी, भाजपला आधी कर्नाटकातील अतिक्रमित मंदिर मालमत्ता परत मिळवण्यासाठी लढू द्या. बेळगावातील अनेक मंदिरांच्या जमिनीवर अतिक्रमण झाले असून, त्याची चौकशी करावी लागणार आहे. स्वेच्छेने देणाऱ्याची जमीन वक्फने ताब्यात घेतली आहे. वक्फच्या विरोधात 30 संघ तयार झाले तरी सत्य लपवता येणार नाही, असेही ते म्हणाले.
याबाबत प्रतिक्रिया देताना अब्दुल गपूर घिवाले म्हणाले, बेळगाव विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या मतदारांनी विविध ठिकाणांहून येऊन मतदान केले, बेळगाव सल्लागार समितीने बंगलोरच्या वक्फ बोर्डाला चांगली सेवा द्यावी आणि वक्फ मालमत्तेचे संरक्षण करावे. वक्फ बोर्डाचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने व्हावे या उद्देशाने ही निवडणूक घेण्यात येत आहे.या निवडणुकीत एक लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या वक्फ संस्थेच्या मुतवल्ली विभागातील दोन जागांसाठी आज मतदान झाले. बेळगाव जिल्ह्यात 59, धारवाडमध्ये 39, बागलकोटमध्ये 111, विजापूरमध्ये 33, कारवारमध्ये 15, गदगमध्ये 78 आणि गदगमध्ये 17 मतदार असून, या सर्वांनी बेळगावच्या डीसी कार्यालयात मतदान केले. निवडणुकीचा निकाल 31 नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे.