निपाणी (वार्ता) : येथील प्रगती नगरामधील साळुंखे गारमेंटच्या व्यवस्थापिका वर्षा साळुंखे यांनी महिलांना उद्योग व्यवसाय मिळवून देण्यासाठी साळुंके गारमेंटची निर्मिती केली होती. त्यानंतर आता जत्राट येथे दुसऱ्या विभागाचे उद्घाटन अंधश्रद्धेला फाटा देत विधवा महिलांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार प्रियांका जारकीहोळी व मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे निपाणी परिसरातून कौतुक होत आहे.
विनोद साळुंखे यांनी स्वागत केले.
खासदार जारकीहोळी म्हणाल्या, समाजाची प्रगती झाली असली तरीही अजूनही काही ठिकाणी अंधश्रद्धा सुरूच आहे. कोणतीही शुभ गोष्ट विधवा महिलांच्या हस्ते केली जात नाही. पण वर्षा साळुंखे आणि विनोद साळुंखे यांनी विधवांच्या हस्ते गारमेंट विभागाचे उद्घाटन करून समाजाला एक वेगळी दिशा दाखवली आहे. या पुढील काळातही अशा महिलांना समाजात मानाचे स्थान मिळणे आवश्यक असल्याचे सांगितले.
वर्षा साळुंखे यांनी, लॉकडाऊन च्या काळात सर्व व्यवहार बंद असले तरी सुरक्षित साधनांचा वापर करून महिलांना काम दिले होते. त्यामुळे अनेक संसार उघड्यावर पडण्यापासून वाचले आहेत. यापूर्वी काळातही महिलांच्या स्वावलंबनासाठी कार्यरत राहणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमास माजी मंत्री वीरकुमार पाटील माजी आमदार काकासाहेब पाटील, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे माजी आमदार सुभाष जोशी, निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, चिकू तालुका काँग्रेस उपाध्यक्ष रोहन साळवे, नदाफ शास्त्री टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष संयोजित निकु पाटील. माजी जिल्हा पंचायत सदस्य सुमित्रा उगळे, सुप्रिया पाटील, मारुती साळुंखे, विकास शिंदे, विजय साळुंखे, जत्राट शाखेच्या व्यवसस्थापिका पूजा रानमाळे यांच्यासह महिला उपस्थित होत्या. वैजयंती साळुंखे यांनी आभार मानले.