Friday , January 10 2025
Breaking News

ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे निधन; ८४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Spread the love

 

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकर पिचड यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. मधुकर पिचड यांना ऑक्टोबरमध्ये ब्रेन स्ट्रोकचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना नाशिकमधील नाईन पल्स रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. तेव्हापासून मधुकर पिचड यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, आज (६ डिसेंबर) वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मधुकर पिचड यांच्या निधनामुळे अकोले तालुक्यावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, मधुकर पिचड हे राज्याचे माजी मंत्री होते. अहिल्यानगर (अहमदनगर) अकोले विधानसभा मतदारसंघातून मधुकर पिचड हे तब्बल सात वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. तसेच मधुकर पिचड यांनी अनेक महत्वाची पदे भुषवली आहेत. तसेच आदिवासी विकास, वन व पर्यावरण मंत्री म्हणून देखील कार्यभार त्यांनी पाहिला होता. अकोले तालुक्यामधील विकासात मधुकर पिचड यांचं महत्वाचं योगदान मानलं जातं. दरम्यान, २०१९ मध्ये मधुकर पिचड यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता.

मधुकर पिचड यांचा राजकीय प्रवास

अकोले पंचायत समितीवर सदस्य म्हणून १९७२ ला निवड.
१९७२ ते १९८० पंचायत समितीवर सभापती म्हणून निवड.
१९८० पासून २००९ पर्यंत सलग ७ वेळेस आमदार म्हणून विधानसभेवर निवडून आले.
१९९५ ते जुलै १९९९ या काळात विधानसभेचे विरोधी पक्षनेते पदाची धुरा सांभाळली होती.
राष्ट्रवादीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणूनही मधुकर पिचड यांनी धुरा सांभाळली होती.
मधुकर पिचड यांचा राजकीय प्रवास काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यानंतर भाजपा.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून शरद पवार यांच्यासोबत होते.
२०१४ मध्ये अकोले मतदार संघात पुत्र वैभव पिचड यांना राष्ट्रवादीकडून निवडून आणले.
२०१९ ला पिचड यांनी आपल्या मुलासह भाजपात प्रवेश केला. त्यावेळी वैभव पिचड यांचा भाजपाच्या तिकीटावर पराभव झाला.
मधुकर पिचड यांनी १९६१ मध्ये अमृत सागर दूध सहकारी संस्थेची स्थापना केली.
मधुकर पिचड यांनी १९९३ मध्ये अगस्ती सहकारी साखर कारखाना स्थापन केला.
आदिवासी विकास, भटक्या जमाती आणि इतर मागासवर्गीय कल्याण, प्रवास विकास आणि पशु, संवर्धन आणि मत्स्यव्यवसाय अशा विविध खात्यांची जबाबदारी पार पाडली होती.

About Belgaum Varta

Check Also

देवदर्शनाला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, ४ जणांचा जागीच मृत्यू

Spread the love  सोलापूर : नव्या वर्षाचे राज्यभर उत्साहात स्वागत करण्यात आले. सरत्या वर्षाला निरोप …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *