कडोली : येथील मराठी साहित्य संघ आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्यातर्फे रविवार ता. 15 डिसेंबर रोजी “काव्यतरंग” हा काव्यवाचनाचा कार्यक्रम होणार आहे. संघाच्या श्री कलमेश्वर वाचनालयात दुपारी 3.30 वाजता हे कविसंमेलन रंगेल.
या कविसंमेलनात बेळगाव परिसरातील 25 कवी सहभागी होणार आहेत. त्यामध्ये कांही नामवंत कविंच्या कविता ऐकण्याची संधी काव्यरसिकांना मिळणार आहे. कविंची संख्या लक्षात घेऊन प्रत्येक कवीला आपली एक कविता सादर करण्याची संधी दिली जाणार आहे.
उदघाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून कडोलीचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक अशोक चौगुले व कडोलीतील माजी सैनिक कल्याण संघाचे अध्यक्ष बाबुराव बाळेकुंद्री उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष भरमाणी डोंगरे असतील.
काव्यरसिकांनी या काव्यतरंग कार्यक्रमाला उपस्थित राहून आस्वाद घ्यावा, असे आवाहन संघातर्फे करण्यात आले आहे.