खानापूर : मणतूर्गा येथे सोमवार दिनांक 16 डिसेंबर 2024 रोजी रवळनाथ मंदिराचे कळस बांधकाम करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वतनदार नारायण महादेव पाटील हे होते. रवळनाथ पूजन श्री रवळनाथ जीर्णोद्धार समिती सदस्य नामदेव गुंडू गुरव पुजारी यांच्या हस्ते करण्यात आले तर मंदिराचा कळस बांधकाम शुभारंभ उद्योजक व माजी अध्यक्ष श्री विठ्ठल रुक्मिणी को-ऑपरेटिव्ह सोसायटी श्री. दीपक नारायणराव पाटील, सेक्रेटरी ग्रामपंचायत करंबळ मारुती यशवंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. खानापूर को-ऑपरेटिव्ह बँक कॅशियर श्री. अनिल पुंडलिक देवकरी यांच्या हस्ते गणेश पूजन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते राजाराम मल्लाप्पा देवलतकर यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी पूजन करण्यात आले तर भाजप नेते गजानन गावडू पाटील यांच्या हस्ते श्री कलावती फोटो पूजन करण्यात आले.
दीप प्रज्वलन श्री. नंदकुमार शामराव पाटील, विठ्ठल अर्जुन पाटील, मोहन सुरप्पा पाटील, सागर पुनाप्पा देवकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी निवृत्त पोस्ट मास्टर मारुती नारायण दळवी यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवळनाथ मंदिर बांधकाम कमिटी कार्याध्यक्ष बाळासाहेब शेलार यांनी केले तर सूत्रसंचालन रवळनाथ मंदिर बांधकाम कमिटी चेअरमन आबासाहेब दळवी यांनी केले. कार्यक्रमाला गावातील नागरिक महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रवळनाथ मंदिर बांधकामासाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक उद्योजक दीपक पाटील यांनी 51000 ची भरीव देणगी दिली तर कै. भरमानी देवलतकर यांच्या स्मरणार्थ त्यांच्या मुलांकडून 12551 रुपयांची देणगी देण्यात आली तसेच मारुती यशवंत पाटील 5551, सुभाष गुंडपीकर 5501, शांताराम देवकरी 5101, सौ. अश्विनी गुंडपीकर 5005, अनिल देवकरी 5001, नारायण पाटील पुणे 5000, वासुदेव पाटील 5015, नामदेव गुरव 5000, नारायण पाटील 5000, विनोद देसाई 1100, भाऊराव देसाई 1021, नंदू पाटील 1001, सागर देवकरी 1001, प्रवीण गुंडपीकर 1000, रामचंद्र लोहार 511, राजाराम देवलकर 510, प्रभाकर गुरव 501, नागेश देवकरी 501, श्रीनिवास दळवी 501, विशाल पाटील 501, मोहन पाटील 500, श्रीराम देवकरी 500, रुजाय पिंटो 300, विनय देवलतकर 201, नागेंद्र कांशीनकोप 200 अशी भरीव देणगी गावकऱ्यांकडून रवळनाथ मंदिर बांधकामासाठी देण्यात आली आहे.