Wednesday , December 18 2024
Breaking News

संत मीरा शाळेच्या प्राथमिक विभागाच्या क्रीडा स्पर्धेला प्रारंभ

Spread the love

 

 

बेळगाव : अनगोळ येथील येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या प्राथमिक विभागाच्या क्रीडा स्पर्धेला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.
स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी राष्ट्रीय हँडबॉल खेळाडू सिद्धांत वर्मा तसेच राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू प्रियांका पाटील, गीता वरपे, चंद्रकांत तुर्केवाडी उपस्थित होते प्रारंभी पाहुण्यांचे हस्ते क्रीडाध्वजारोहण करण्यात आले, यानंतर शालेय खेळाडू प्रणिती बडबंजी, पूर्वी बडबंजी, आरोही देसाई, ईश्वरी कुलकर्णी, अद्विता दळवी, आदिती सुरतेकर, कृतिका हिरेमठ, कनिष्का हिरेमठ यांनी क्रीडाज्योत मैदानाभोवती फिरून पाहुण्यांच्याकडे सुपूर्द केले तर राष्ट्रीय हँडबॉल खेळाडू आरोही देसाईने सहभागी खेळाडूंना शपथ देवविली. तत्त्वपूर्वी पाहुण्यांचा परिचय अनुष्का बोकमुरकर हिने पाहुण्याचा परिचय केला. यानंतर सिद्धांत वर्मा व प्रियांका पाटील यांनी आपल्या शालेय जीवनातील खेळाचे महत्व व खेळाडूंनी अभ्यासाबरोबर खेळामध्ये प्राविण्य दाखविल्यास यश संपादन करता येते याचे महत्त्व सांगितले. यानंतर शालेय क्रीडाशिक्षक चंद्रकांत पाटील व शिवकुमार सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा स्पर्धांना प्रारंभ झाला. याप्रसंगी शालेय शिक्षिका सरोजिनी कटगेरी, अचल हूद्दार, माया निलजकर, विना जोशी, अरुणा पुरोहित, फिलोतिमा गुमास्ते, चंद्रकांत तुर्केवाडी इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूर्वी बडमंजी तर अपेक्षा मठपती हिने आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

भीमगड परिसरातील 754 कुटुंबे व 3059 गावकऱ्यांचे टप्प्याटप्प्याने स्थलांतर : मंत्री ईश्वर खंड्रे

Spread the love  तळेवाडी जंगलात वनमंत्र्यांची ग्रामस्थांशी बैठक खानापूर : भीमगड वनपरिक्षेत्रातील गावांतील रहिवाशांना योग्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *