Wednesday , December 18 2024
Breaking News

बँकेच्या प्रगतीसाठी सभासदांनी सत्ताधारी पॅनलच्या पाठीशी उभे रहावे : दिगंबर पवार

Spread the love

 

 

बेळगाव : मराठा समाजाची बँक म्हणून ओळखली जाणारी मराठा सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक येत्या 22 डिसेंबर रोजी होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पॅनलने शिवाजीनगर मधून आपल्या प्रचाराची सुरुवात केली. शिवाजीनगर भागातील प्रशांत चिगरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून उर्वरित संचालकांची निवड प्रक्रिया 22 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. सदर निवडणुकीत सत्ताधारी पॅनलने विद्यमान संचालक मंडळातील चार संचालकांना डच्चू देऊन सत्ताधारी पॅनलने चार नवीन चेहऱ्याना उमेदवार म्हणून संधी दिली आहे. मराठा समाजाचा मानबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीकडे मराठा समाजासह संपूर्ण बेळगाव शहराचे लक्ष लागून राहिले आहे.
बँकेचे विद्यमान अध्यक्ष दिगंबर पवार, बाळासाहेब काकतकर, आणि ज्येष्ठ संचालक बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली नवीन पॅनल तयार करण्यात आले असून मागील कार्यकाळातील सत्ताधारी गटात कार्यरत असलेल्या लक्ष्मण होनगेकर (उचगाव), बी एस पाटील (राकसकोप), सुनील अष्टेकर (मुतगा) आणि सुशील कुमार कोकाटे (बेळगाव) या चार विद्यमान संचालकांना वगळून सत्ताधारी पॅनलने नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. शिवाजीनगर विभागातील प्रशांत चिगरे यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांचा सत्कार करून शिवाजीनगर भागातूनच पॅनलने आपल्या प्रचाराची सुरुवात केली.
बँकेचे विद्यमान चेअरमन दिगंबर पवार “बेळगाव वार्ता”शी बोलताना सांगितले की, मागील पाच वर्षात बँकेने प्रगतीची घोडदौड कायम राखली आहे. कोरोना काळात देखील बँकेचे कार्य उल्लेखनीय आहे. मागील पाच वर्षात बँकेच्या बेळगावसह परिसरातील शाखा सुरू करण्यात आल्या आहेत. गणेशपुर, सांबरा रोड आणि खानापूर या ठिकाणी सुरू असलेल्या शाखांमध्ये बँकेचे कार्य प्रगतीपथावर आहे. बँकेची उत्तरोत्तर प्रगती होत असून सत्ताधारी पॅनलने पुढील पाच वर्षासाठी होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सामान्य गटातून सामान्य पदासाठी मोहन चौगुले, विनोद हंगिरगेकर, विश्वनाथ हंडे या विद्यमान संचालकांसह मोहन बेळगुंदकर, विनायक होनगेकर, विक्रमसिंह कदम पाटील या नूतन उमेदवारांची निवड केली आहे तर महिला गटातून सौ. दिपाली दळवी आणि विद्यमान संचालिका रेणू किल्लेकर यांची निवड करण्यात आली आहे. यासह बी गटातून विश्वजीत हसबे, अनुसूचित जमाती वर्गातून लक्ष्मण नाईक आणि अनुसूचित जाती वर्गातून अशोक कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. नव्या कायद्यानुसार दहा वर्षाच्या कालावधीसाठी संचालकांना कोणतेही बदल करता येत नाहीत. सहकार चळवळ मोडीत काढण्याचा सरकारचा हा डाव असून सहकार क्षेत्रातील अग्रगण्य बँकेची उत्तरोत्तर प्रगती साधण्यासाठी सभासदांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. सध्या बँकेच्या ठेवीची उलाढाल 250 कोटी असून आगामी काळात पाचशे कोटींच्या ठेवीची उलाढाल करण्याचे उद्दिष्ट सत्ताधारी पॅनलने ठेवल्याचे विद्यमान चेअरमन दिगंबर पवार यांनी सांगितले.

बाळासाहेब काकतकर म्हणाले की, मराठा समाजाचा मानबिंदू असणाऱ्या मराठा सहकारी बँकेने आपली 82 वर्षाची कारकीर्द पूर्ण केली आहे. या बँकेची पंचवार्षिक निवडणुकीच्या 22 डिसेंबर रोजी होणार आहे या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पॅनलच्या प्रचाराला वेग आला असून ही निवडणूक चुरशीची होणार आहे. मराठा सहकारी बँकेची निवडणूक आजतागायत एकदाही बिनविरोध झालेली नाही असे देखील ते यावेळी मिळाले. सभासदांची विश्वासार्हता जोपासत ठेवीदार, कर्जदार, खातेदार, कर्मचारी, संचालक मंडळाच्या परस्पर सहकार्याने बँकेची प्रगतीपथावरील घोडदौड सुरू आहे. गेल्या पाच वर्षात 130 कोटींच्या ठेवीचा टप्पा 250 कोटींवर येऊन ठेपला असून भविष्यात हा टप्पा 500 कोटींपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. सरकारी नियमानुसार 2550 सभासद निवडणुकीसाठी पात्र असून सभासदांनी सत्ताधारी पॅनलला निवडून बँकेच्या प्रगतीसाठी हातभार लावावा, असे आवाहन सत्ताधारी पॅनलतर्फे यावेळी करण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

भीमगड परिसरातील 754 कुटुंबे व 3059 गावकऱ्यांचे टप्प्याटप्प्याने स्थलांतर : मंत्री ईश्वर खंड्रे

Spread the love  तळेवाडी जंगलात वनमंत्र्यांची ग्रामस्थांशी बैठक खानापूर : भीमगड वनपरिक्षेत्रातील गावांतील रहिवाशांना योग्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *