बेळगाव : मराठा को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक येत्या 22 डिसेंबरला आहे. मराठा बँकेच्या सत्ताधारी पॅनलने निवडणुकीच्या प्रचारकार्याला सुरुवात केली असून काल बुधवार दिनांक सायंकाळी सहा वाजता बँकेचे ज्येष्ठ संचालक बाळाराम बाबुराव पाटील यांच्या निवासस्थानापासून सत्ताधारी पॅनलच्या उमेदवारांनी आपल्या प्रचाराला शुभारंभ केला. त्यानंतर सदाशिवनगर, नेहरूनगर, शाहूनगर, कंग्राळी आदी भागात प्रचार करण्यात आला. यावेळी सुनील अष्टेकर, नारायण अष्टेकर, जयंत नार्वेकर, नागेश झंगरूचे, नाकाडी तरळे यांच्यासह मराठा बँकेच्या सभासदांच्या घरोघरी जाऊन त्यांच्या गाठीभेटी घेतल्या आणि सत्ताधारी गटातील सर्व उमेदवारांना आपले बहुमोल मत देऊन संपूर्ण पॅनल निवडून आणण्याची विनंती केली.
शाहूनगर, कंग्राळी बी.के. आदी भागात तानाजी पाटील यांनी स्वतः प्रचारात सहभाग घेऊन मतदारांना मतदान स्थळी पाठवून शंभर टक्के मतदान करून घेण्याची ग्वाही दिली. त्यानंतर आज गुरुवार दिनांक 19 डिसेंबर रोजी सत्ताधारी पॅनलचे उमेदवार व समर्थक यांनी तहसीलदार गल्ली, फुलबाग गल्ली, भांदूर गल्ली, पाटील मळा, मुजावर गल्ली, महाद्वार रोड आदी भागात प्रचार करत सभासदांना घरोघरी जाऊन गाठीभेटी घेतल्या आणि मराठा बँकेच्या सर्वांगीण विकासासाठी पुन्हा एकदा आपल्याला निवडून द्या अशी विनंती केली. बँकेच्या सभासदांनी सत्ताधारी पॅनलला आपला संपूर्ण पाठिंबा व्यक्त करत त्यांना बहुमताने निवडून देण्याचे आश्वासन यावेळी दिले.