Saturday , October 19 2024
Breaking News

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मराठीचे संवर्धन करणे प्रत्येकाची जबाबदारी : प्राचार्य पी. बी. पाटील

Spread the love

प्राथमिक माध्यमिक महाविद्यालयातील शिक्षक प्राध्यापकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा : सुट्टीच्या काळात वैचारिक मेजवानी : संमेलन यशस्वी करण्याचा निर्धार

बेळगाव : आज मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा मिळवण्यासाठी चालत असलेला प्रयत्न तो यशस्वी केला जावा. यासाठी शासनाने विविध प्रकारचे सहकार्य करून मराठी भाषेला लवकरात लवकर अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला जावा अशी वेळोवेळी मराठी भाषिकांच्याकडून मागणी होत आहे. तरी याकडे केंद्र शासनाने लवकरात लवकर लक्ष घालून या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला जावा. भाषा आणि मराठी संस्कृती आणि अस्मिता जपण्यासाठी प्रत्येक मराठी भाषिकांनी एकत्र येऊन आपली संस्कृती जपण्याचे कार्य नीटपणाने आपण केले गेले पाहिजेत. वेळोवेळी होणारे अन्याय अत्याचार त्याच्यावरती उपाय आखून सुधारणा करावी. बेळगाव परिसरातील साहित्य परंपरा नवोदित लेखक कवी कवयित्री ना एक उत्तम व्यासपीठ देण्याचे कार्य प्रगतिशील लेखक संघ करीत आहे. विद्यार्थी पालक शिक्षक प्राध्यापक आणि समाजाने जागरूक राहून परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे. लेखक कवी साहित्यिक विचारवंत निर्माण व्हावेत. बेळगावमध्ये चांगल्या पद्धतीचे परिवर्तन व्हावे वैचारिक जडण घडण होऊन ज्ञानाच्या कक्षा वाढाव्यात. ज्ञान हे सर्वांना पुरून उरणारे अमृत आहे; हे समाजाने समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात टिकायचे असेल तर वेळोवेळी संवेदनशीलतेने कार्य केले पाहिजे. शाळा-महाविद्यालयांमध्ये चांगल्या पद्धतीचे उत्तम दर्जाचे शिक्षण दिले गेले पाहिजेत. चांगले विचार चांगले संस्कार उत्तम ज्ञान सर्वांगीण विकास घडवून आणणारे सृजनशील उपक्रम राबविले गेले पाहिजेत. दिवसेंदिवस बदलत जाणारी विषमता आणि विवंचना दूर करून समाजामध्ये एक सुदृढ समाज निर्मितीसाठी पाऊले उचलायला हवी. देशामध्ये विसंगती आहे ती भरुन काढणे आवश्यक आहे. निर्माण झालेली पोकळी आहे ती दूर करण्यासाठी लेखकांनी वास्तववादीलेखनकरुन विषमता दूरकेलीपहिजे. साहित्य हे लोकांच्या कल्याणाकरिता झाले पाहिजेत; तरच हे लेखन समाजोपयोगी होईल असे म्हणता येईल. साहित्यिकांनी आपल्या जगण्या-मरण्याचे प्रश्न आणि आपल्या जिव्हाळ्याचे संबंध साहित्यातून मांडणे आवश्यक वाटते. समाज परिवर्तन होण्यासाठी साहित्य लेखणीतून जागृती करायला हवी. माणसाच्या आयुष्यातील जिव्हाळ्याचे विषय मांडून विकास घडवून क्रांतिकारी विचार समाजाला देण्याची आवश्यकता आहे. शाळा महाविद्यालय मध्ये उत्तम प्रकारचे शिक्षण दिले पाहिजेत. मराठी भाषा मराठी संस्कृती मराठी अस्मिता टिकवण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाने एकत्र येऊन कार्य करण्याची गरज आहे. विविध प्रकारच्या आपण चळवळ उभ्या करुन कार्य करण्याची मानसिक तयारीतून समाजाला दिशा देण्याचे कार्य प्रगतिशील लेखक कवी साहित्यिक विचारवंत निर्माण होतील असे कार्यकर्ते तयार व्हायला हवेत. दुर्गम भागांमध्ये चालत असलेल्या शाळा-महाविद्यालयातील वस्तुस्थिती पाहिली तर ती अतिशय गंभीर आहे या सुधारणा करण्यासाठी कटिबद्ध असायलाच हवे. शिक्षक, प्राध्यापक, पत्रकार, विचारवंत लेखक, साहित्यिकांनी चिंतन मंथन करून नव्या जोमाने कार्य केले पाहिजेत. मराठी अस्मितेला लढण्यासाठी मराठी भाषा आणि भाषेचा गौरव उंचावण्यासाठी, टिकविण्यासाठी वेळोवेळी आपण प्रत्येकाने सहकार केले पाहिजेत आणि सहकार्य ही केले पाहीजेत; भाषा संवर्धन करुयात रुजवूयात, टिकवूयात, मराठी भाषा संवर्धन करूयात, आपण सर्वजण या ठिकाणी सहकार्य करूयात. प्रगतिशील लेखक संघाचे साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी आपण सर्वजण सहकार्य करुन यशस्वी करूयात, असे आवाहन आणि प्रतिपादन मराठी टीचर ट्रेनिंग कॉलेजचे माजी प्राचार्य पी. बी. पाटील यांनी आपल्या अध्यक्ष भाषणावरून त्यांनी विचार व्यक्त केले.

बेळगाव येथील धर्मवीर संभाजी मार्ग जत्तीमठ येथे प्रगतिशील लेखक संघ बेळगाव यांच्यावतीने घेण्यात आलेली बैठक गुरुवार दिनांक 21 एप्रिल 2022 रोजी पार पडली. संमेलनासंदर्भामध्ये संमेलन यशस्वी करण्याचा निर्धार करून सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

अध्यक्ष मराठी टीचर्स ट्रेनिंग कॉलेजचे निवृत्त प्राचार्य पी . बी. पाटील होते.

सामाजिक कार्यकर्ते मधु कणबर्गी, माजी नगरसेवक अनिल पाटील , प्रा. निलेश शिंदे यांची भाषणे झाली.

स्वागत सुधीर लोहार यांनी केले. प्रास्ताविक प्रा. लक्ष्मण बांडगे यांनी केले.
सूत्रसंचालन प्रमोद पवार यांनी केले. आभार सागर गुंजीकर यांनी मानले.

यावेळी विविध ठिकाणी जागृती करून बेळगाव शहर, अनगोळ, वडगाव, कणबर्गी, गणेशपुर, हिंडलगा, सुळगा, टिळकवाडी, वडगांव, येळ्ळूर, सुळगा याठिकाणी जागृती बैठका घेण्यात आल्या.

विविध ठिकाणी उपस्थित असलेले प्राचार्य आनंद आपटेकर, प्राचार्य विश्वजित हसबे, छायाचित्रकार डी. बी. पाटील, अनिल कडोलकर, प्रा विशाल करंबळकर, प्रा. नारायण पाटील, नागराज पाटील, निखिल भातखंडे, गोविंद पाटील, आनंद गोरल, प्रा. एम. बी. हुरूडे, पृथ्वीसिंग, प्रकाश शिरोळकर, पुंडलिक पावशे, माजी महापौर शिवाजी सुंठकर, जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल, नव साहित्याचे शेष जवळकर, नितीन जवळकर, मनिषा भोसले, श्रीधर पाटील, मनीषा हलगेकर, तुकाराम हुंदरे, रामलिंग गुरव, मयूर बसरीकट्टी, वाय. पी. नाईक, नागेश बसरीकट्टी, डॉ. संजीवनी खंडागळे, बी. डी.बजत्ती महाविद्यालयाचे प्रा. डॉ. भालेकर, विरेश हिरेमठ, मराठा मंडळ पदवीपूर्व महाविद्यालयचे प्रा. एस. एस. पाटील, ॲड. नामदेव मोरे, यशवंतराव मोरे, रेखा मोरे, युवराज नाईक, अभिषेक सुतार, सौ. वैशाली कणबरकर, कोमल गावडे, रामा कडोलकर रविचंद्र वाय. नाईक, मोहनराव मोरे, अरूण टुमरी, लक्ष्मण पाटील, धाकलू ओऊळकर, सुनिल देसुरकर यावेळी वेगळ्या ठिकाणी मान्यवर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी बैठक

Spread the love  बेळगाव : एक नोव्हेंबर काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *