बेळगाव : भारतीय ट्रेडर्स आणि यश कम्युनिकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश चतुर्थी निमित्त 6 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान शॉपिंग उत्सव- कंजूमर प्रदर्शनाचे 10 दिवस आयोजन करण्यात आले आहे.
मराठा मंदिराच्या भव्य सभागृहात होणाऱ्या या प्रदर्शनात 60 हुन अधिक कंपन्याने सहभाग घेतला आहे. त्यामध्ये अनेक प्रसिद्ध कंपन्यांचे ब्रँडेड गारमेंट्स ज्यामध्ये शर्ट्स, पार्टीवेअर कॅज्युअल टी शर्ट, स्पोर्टस वेअर, जीन्स, काॅटन व जीन्स ट्राऊझर्स, लोअर ट्राऊझर्स, महिलांसाठी स्वेटर्स, लेगिन, स्वेट शर्ट, लेडीज कुर्ती, पायजमा, कार्डीगन्स, जॅकेट, हिरा व पॅंटी, पर्स व बेल्ट बरोबरच खादी शर्ट आणि ब्रॅंडेड शूज उपलब्ध होणार आहेत.
शॉपिंग उत्सवमध्ये स्वच्छता उपकरणे, स्पीड ऍडम्परी, ओकाया कंपनीची विविध इलेक्ट्रिक स्कूटर्स, वीणा वर्ल्डतर्फे प्रवासोध्यम, तसेच आयुर्वेदिक प्रसाधने, आर्टिफिशल ज्वेलरी, केरळा हलवा, म्हैसूर नमकीन, हँडलुम- हँडीक्राफ्ट, किचन वेअर्स, शॉपिंग मशीन, बिलींग मशीन, नाचना व इतर पापड, चुरण, राजस्थानी मोजडी, मसाज ऑइल, लेडीज गाऊन, मॅग्नेटिक ब्रेसलेट, साड्या, बांगड्या, डी एस ग्रुपची तुलसी खजूर, याबरोबरच स्टडी टेबल, मॅजिक बुक टॅब, रंगोली उत्पादने, युरेका फोर्बची सफाई व वाॅटर प्युरीफायर उत्पादने, कलाकुसरिचे झुले, लाकडी फर्निचर, एअर रिंग्स, लहान मुलांची खेळणी आणि खाद्यपदार्थाचे विविध स्टॉल ज्यामध्ये केक, पॅस्ट्री, बेकरी उत्पादने, दाबेली, स्वीट काॅर्न, पाॅप काॅर्न, पोटॅटो ट्वीस्टर, कोल्हापुरी भेळ, पाणीपुरी याचबरोबर थालीपीठ, आप्पे, चहा- कॉफी उपलब्ध होणार आहे.
बऱ्याच दिवसानंतर बेळगावत ह्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याने आणि सर्व वस्तू सवलतीच्या दरात मिळणार असल्याने बेळगावकरांना गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खरेदीची ही सुसंधी आहे. या प्रदर्शनात प्रवेश मोफत असून ग्राहकांसाठी विशेष भेट योजना आहे. नागरिकांनी अवश्य भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta