Saturday , October 19 2024
Breaking News

सुवर्णलक्ष्मीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

Spread the love

३८ लाख ३९ हजार निव्वळ नफा, १७% लाभांश जाहीर
बेळगाव (प्रतिनिधी) : गणपत गल्ली येथील श्री सुवर्णलक्ष्मी को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., बेळगाव या संस्थेची २५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार दि. २० सप्टेंबर रोजी संस्थेच्या मुख्य कार्यालयात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल शिरोडकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून कॅपिटल वन सोसायटीचे चेअरमन शिवाजीराव हंडे हे होते. संस्थेचे संस्थापक मोहन कारेकर व व्हा. चेअरमन विजय सांबरेकर हे व्यासपीठावर उपस्थित होते.
संस्थेचे सचिव अभय हळदणकर यांनी सर्वांचे स्वागत केले. प्रमुख पाहुणे शिवाजीराव हंडे व व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. विठ्ठल शिरोडकर यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्थेचे सचिव अभय हळदणकर यांनी मागील वर्षाच्या सभेचा वृत्तांत वाचून मंजूरी घेतली. संस्थेचे अकौंटंट प्रदीप किल्लेकर यांनी नफा-तोटा पत्रक व ताळेबंद पत्रकाचे वाचन करुन मंजूरी घेतली व पुढील वर्षासाठी अंदाजपत्रक सादर करुन नफा विभागणी वाचन करुन मंजूरी घेतली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल शिरोडकर यांनी मागील वर्षाचा आढावा घेतला व संस्थेने सर्वांगिण विकासासाठी प्रगती करत यावर्षी रु. ३८ लाख ३९ हजार ९५२ रुपये इतका नफा मिळविला असून सभासदांना १७% लाभांश देणार असल्याचे जाहीर केले. तसेच ‘विश्वासू माणसे विश्वासू सोसायटी’ हे ब्रिद वाक्य संस्थेचे कार्यकारी मंडळ सतत आपल्या डोळ्यासमोर ठेवून कोणताही निर्णय घेत असतात असे ते म्हणाले. यावेळी प्रमुख पाहुणे शिवाजीराव हंडे यांनी संस्थेला आपल्या शुभेच्छा देऊन सुवर्णलक्ष्मी सोसायटी आपल्या ठेवीदारांच्या ठेवी नियोजनरित्या ठेवून संस्थेला अधिक मजबूत करीत आहे तसेच कर्जे योग्यरित्या वाटत करीत आहे. येणार्‍या काळात संस्था अधिक नफा कमवून भागधारकांना अधिक लाभांश देईल असे ते म्हणाले.
यावेळी संस्थेचे संचालक विनायक कारेकर, दिपक शिरोडकर, प्रकाश वेर्णेकर, समर्थ कारेकर, विराज सांबरेकर, माणिक सांबरेकर, राजू बांदिवडेकर, संचालिका मधुरा शिरोडकर तसेच सभासद प्रियांका कारेकर, दीपा शिरोडकर, विनया कारेकर, हेमा सांबरेकर, नम्रता महांगावकर, जयश्री धुडूम, माया चंदगडकर, राजू नवले, विजय चव्हाण, प्रविण शिरोडकर, दत्ता महांगावकर, शशिकांत कलघटकर, रवि टोपाजिचे, सरिता चौगुले, अजित भोसले, रामचंद्र पाटीलसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सूत्रसंचालक अभय हळदणकर तर आभार प्रदीप किल्लेकर यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी बैठक

Spread the love  बेळगाव : एक नोव्हेंबर काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *