बेळगाव : दीपावली सणानिमित्त विजया ऑर्थो अँड ट्रामा सेंटरचे डॉ. रवी पाटील यांच्या वतीने येथील अयोध्या नगर मधील महिला मंडळाला पणत्या देण्यात आल्या.
दरवर्षी दीपावली सणानिमित्त डॉ. रवी पाटील शहरातील प्रत्येक नागरिकाच्या घरात पणत्या पेटाव्यात आणि त्यांची दिवाळी साजरी व्हावी या उद्देशाने त्या वितरित करत असतात. त्याचप्रमाणे यावर्षीही त्यांनी पणत्या वितरित करून त्यांच्या या उपक्रमाला सुरुवात केली.
अयोध्या नगर येथील परशुराम किल्लेकर यांच्या टेरेसवर सदर कार्यक्रम पार पडला. यावेळी महिला मंडळाच्यावतीने विजया ऑर्थो अँड ट्रॉमा सेंटरचे डॉ. रवी पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर डॉ. रवी पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, या भागात महिला मंडळ स्थापन केल्याने अनेकांना काम मिळणार आहे. तसेच याच्या माध्यमातून महिला स्वावलंबी बनणार आहेत. महिलांनी स्वतःच्या पायावर उभारून इतर महिलांनाही काम देण्याचे कार्य करावे. तसेच छोटे मोठे व्यवसाय सुरू करून आपल्या पायावर खंबीरपणे उभे राहावे, असे मनोगत व्यक्त केले. त्यानंतर त्यांच्या हस्ते येथील महिला मंडळातील सर्व सदस्यांना पणत्यांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी सर्व लोकसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष वीरेश बसय्या हिरेमठ, परशुराम किल्लेकर, सुभाष पाटील, बसया मुरगोडी, सुरज किल्लेेकर वनश्री भातकांडे, भारती किल्लेकर, सुरेखा चौगुले, ओमाणा चौगुले, कुमुद पाटील, मंगल पाटील, गायत्री मोदगेकर, रोहिणी नाईक, स्मिता नाईक, सायली भातकांडे, शशिकला माने, पूजा माने, नलिनी माने, स्नेहलता पाटील, सुनीता चौगुले, कांचन चव्हाण पाटील, अर्पिता भातकांडे, स्मिता जाधव, अक्षता जाधव, क्रांती किल्लेकर, नीता निलजकर, उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta