बेंगळुरू : सौंदत्तीचे आमदार, कर्नाटक विधानसभेचे उपसभापती आनंद मामनी (वय 56) यांचे निधन झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते.त्यांच्यावर बेंगळुरु मनीपाल रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच शनिवारी मध्यरात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
आनंद (विश्वनाथ) चंद्रशेखर मामनी यांचा जन्म १८ जानेवारी १९६६ रोजी बेळगाव जिल्ह्यातील सौदती येथे झाला. वडील चंद्रशेखर मल्लिकार्जुन मामनी, आई श्रीमती गंगाम्मा मामनी. हिंदू लिंगायत (पंचमसाली) समाजातील, ते सौंदतीच्या प्रतिष्ठित कुटुंबातील होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण सरकारी शाळा क्रमांक १, सौंदत्ती येथे आणि उच्च माध्यमिक शिक्षण केएलई स्कूल, सौंदत्ती येथे पूर्ण झाले.
सौंदत्तीचे श्री एसव्हीएस बेलुब्बी कॉलेज मध्ये बी. कॉम पदवी शिक्षण पूर्ण केले. आनंद मामनी यांना शेतीची आवड होती आणि राजकारणात येण्यापूर्वी ते शेती करत होते. 1984 ते 1999 पर्यंत ते कापसाचा व्यापार करत होते. आनंदा मामनी यांच्या पश्चात पत्नी सौ. रत्ना आनंद मामनी. तसेच एक मुलगी व एक मुलगा अशी दोन मुले आहेत.
आनंद मामनी यांचे पार्थिव बेंगलोर हून सौंदत्तीला पाठवण्यात येत आहे. आज दुपारी सौंदत्ती येते त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta