
बेळगाव : बेळगाव वार्ता आयोजित व किरण जाधव प्रायोजित उत्कृष्ट श्रीगणेश मूर्ती व आकर्षक सजावट स्पर्धा- 2022 चा बक्षीस वितरण समारंभ नुकताच पार पडला.
यावेळी मराठा समाजाचे नेते किरण जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक बेळगाव वार्ताचे संपादक सुहास हुद्दार यांनी केले.
यावेळी बोलताना किरण जाधव म्हणाले की, “बेळगाव वार्ता” हे सीमाभागातील एक अग्रगण्य न्युज पोर्टल आहे. बेळगाव वार्ताने अश्या प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करून स्पर्धकांच्या सुप्त कलागुणांना एकप्रकारे प्रोत्साहन देण्याचे कार्य केले आहे. यापुढे देखील बेळगाव वार्ताने अश्याच विविध स्पर्धांच्या माध्यमातून समाजाला प्रोत्साहन द्यावे. त्यांच्या या कार्यात आपण नेहमीच त्यांच्या पाठीशी आहे, असे सांगत त्यांनी विजेत्या स्पर्धकांचेही कौतुक केले.
सदर स्पर्धा बेळगाव दक्षिण, उत्तर, बेळगाव ग्रामीण व खानापूर अशा चार विभागात घेण्यात आली होती. दक्षिण विभागातून विशाल कंग्राळकर यांना आकर्षक गणेश मूर्तीसाठी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले तर आकर्षक सजावटीसाठी नाथ गुंडू कर्लेकर यांना प्रथम क्रमांक देण्यात आला.
बेळगाव उत्तरमध्ये आकर्षक मूर्तीसाठी दयानंद हुंदरे यांना प्रथम तर आकर्षक सजावटीसाठी प्रविणकुमार मुचंडीकर यांना प्रथम क्रमांक देण्यात आला.
ग्रामीणमध्ये आकर्षक श्रीगणेश मूर्तीसाठी राहुल उरणकर यांना तर आकर्षक सजावटीसाठी भरत माळवी यांना प्रथम पारितोषिक देण्यात आले.
खानापूर तालुक्यात आकर्षक गणेश मूर्तीसाठी माणिक देसाई यांना तर आकर्षक सजावटीसाठी संदेश कुंभार यांना प्रथम पारितोषिक देण्यात आले.
यावेळी प्रकाश नंदिहळ्ळी, शिवानी पाटील, उमेश पाटील,
मारुती घाडी, हिरालाल चव्हाण, नवरत्न सिंग पनवार, संतोष होंगल, अक्षय साळवी, अनिल पाटील, सेजल पाटील आदी उपस्थित होते.
शेवटी शेखर पाटील यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta