बेळगाव : पाकिस्तानचे परराष्ट्रीय मंत्री बिलावल भुट्टो यांच्या वक्तव्याचा निषेध करत बेळगावमध्ये निदर्शने करण्यात आली. बिलावल भुट्टो यांच्या पाकिस्तानच्या वक्तव्याचा निषेध करत भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी बेळगाव शहरात आंदोलन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणारे पाकिस्तानचे मंत्री बिलावल भुट्टो यांचा निषेध करत त्यांनी पाकिस्तानविरोधात संताप व्यक्त केला. भाजपचे आमदार अनिल बेनके, सरचिटणीस मुरघेन्द्रगौडा पाटील यांच्या नेतृत्वात बेळगाव येथील चन्नम्मा सर्कल येथे हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी माजी आमदार संजय पाटील पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, भारताने पाकिस्तानला अनेकदा युद्धात धडा शिकवला आहे, मात्र पाकिस्तानने भारताविरुद्ध कुत्र्यासारखे भुंकणे सोडलेले नाही. यावेळी आमदार अनिल बेनके, भारतीय जनता पक्षाच्या नेत्या लीना टोपाण्णावर, मुरघेंद्र गौडा पाटील, पृथ्वी सिंह, दिग्विजय सिद्धनाल आदी उपस्थित होते.