बेळगाव : बेळगाव येथील मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृहविज्ञान महाविद्यालयात आयक्यूएसी आणि एन.एस.एस.घटका तर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 126 वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी पदी नँक समन्वय अधिकारी प्रा. आर. एम. तेली उपस्थित होते तर अध्यक्षपदी महाविद्यालयाचे प्राचार्य जी. वाय. बेन्नाळकर होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी एन.एस.एस. अधिकारी प्रा. राजू हट्टी यांनी सर्वांचे स्वागत केले. प्रा. मनोहर पाटील नेताजींच्या कार्याचा आढावा घेतला. तद्नंतर प्रमुख अतिथी पदावरून बोलताना प्रा. एम. आर. तेली म्हणाले की, प्रत्येकांच्या मनात राष्ट्रभक्तिची ज्योत जागृत करण्याचे कार्य नेताजीनी केले. राष्ट्रभक्ती देशाच्या प्रगतीसाठी उपयोगी ठरते. नेताजी युवांचे प्रेरणास्थान होते. देशभक्ति आणि देश उद्धाराची भावना हीच नेताजींच्यासाठी खरी श्रद्धांजली ठरेल.
या कार्यक्रमाला प्रा. जी. एम. कर्कि, डॉ. डी. एम. मुल्ला, प्रा. नाडगौडा, डॉ. आरती जाधव, डॉ. वृषाली कदम, प्रा. सोनाली पाटील, प्रा. भाग्यश्री रोखडे, प्रा. नागश्री रामदुर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta