वडगाव येथे स्थलांतरित नूतन शाखेचे उद्घाटन
येळ्ळूर : येळ्ळूर येथील नेताजी मल्टीपर्पज को-ऑप सोसायटीने सहकारात एक वेगळाच आदर्श निर्माण केला असून, या संस्थेने केलेली प्रगती खरोखरच कौतुकास्पद अशीच आहे. येळ्ळूर सारख्या खेड्यातुन पुढे येत या संस्थेने लोकांसमोर एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे. या संस्थेने केवळ नफा एके नफा न मिळवता सामाजिक उपक्रमही राबवले आहेत, अलीकडे या सोसायटीने बहुउद्देशीय सोसायटी करून नवनवीन सेवा सभासदासाठी सुरू केल्या आहेत कारभार गल्ली वडगाव येथे स्वतःची इमारत उभी करून एक वेगळाच आदर्श या संस्थेने सर्वांसमोर ठेवला आहे. नेताजी सोसायटीची येळ्ळूर येथे स्वतःची भव्य अशी इमारत असून परमेश्वर नगर येळ्ळूर या ठिकाणी नेताजी मराठी सांस्कृतिक भवन समाजासाठी व सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी उभे केले आहे, त्याचबरोबर आता वडगाव कारभार गल्ली या ठिकाणी शाखेसाठी स्व- मालकीची इमारत खरेदी केली असून, त्यांचे हे कार्य कौतुकास्पद असेच आहे, असे मत मराठा को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन दिगंबर पवार यांनी व्यक्त केले. ते येळ्ळूर येथील नेताजी मल्टीपर्पज को- ऑप सोसायटीच्या वडगाव येथील नूतन स्थलांतरित शाखेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे चेअरमन डी. जी. पाटील हे होते. तर पाहुणे म्हणून माजी आमदार गुरुवर्य परशुरामभाऊ नंदीहळ्ळी, ॲड.सागर खन्नुकर, कॉसमॉस बँकेचे अधिकारी कुलदीप वैद्य, रूपाली तशीलदार, आदी यावेळी उपस्थित होते.
सोमवार (ता. 23) रोजी सायंकाळी सहा वाजता कारभार गल्ली वडगाव या ठिकाणी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त या स्थलांतरित शाखेचे उद्घाटन करण्यात आले. प्रस्ताविक सोसायटीचे संचालक संजय मजूकर यांनी केले. कारभार गल्ली वडगाव या ठिकाणी सोसायटीने स्व-मालकीची इमारत घेतली, असून सोसायटीच्या या स्व- मालकीच्या मुख्य प्रवेशद्वाराचे उद्घाटन माजी आमदार गुरुवर्य परशुरामभाऊ नंदिहळ्ळी यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मुख्य काउंटरचे उद्घाटन मराठा बँकेचे चेअरमन दिगंबर पवार यांनी फीत कापून केले. त्यानंतर मॅनेजर केबिनचे उद्घाटन व्हा.चेअरमन आर. एम मुरकुटे यांनी केले, सेफ लॉकरचे उद्घाटन कॉसमॉस बँकेचे अधिकारी कुलदीप वैद्य व रुपाली ताशीलदार यांच्या हस्ते झाले, मीटिंग हॉलचे उद्घाटन ॲड. सागर खन्नुकर यांनी केले, त्याचबरोबर नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे अनावरण संस्थेचे अध्यक्ष डी. जी. पाटील व उपाध्यक्ष आर. एम. मुरकुटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी आमदार गुरुवर्य परशुरामभाऊ नंदीहळ्ळी यांनी सोसायटीच्या कार्याचे कौतुक केले व संस्थेची भविष्यात ही उत्तरोत्तर प्रगती होवो अशा शुभेच्छा दिल्या, त्याचबरोबर ॲड. सागर खन्नूकर यांनीही संस्थेच्या संचालकांचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. यावेळी संदीप खन्नूकर, नवहिंदचे चेअरमन उदय जाधव, नवहिंद क्रीडा केंद्राचे अध्यक्ष शिवाजी सायनेकर, नवहिंद मल्टीपर्पजचे अध्यक्ष डी. एन. पाटील, प्रियदर्शिनी नवहिंद महिला सोसायटीच्या अध्यक्षा माधुरी पाटील, ब्रह्मलिंग सोसायटीचे अध्यक्ष जोतिबा कालसेकर, स्वामी विवेकानंद सोसायटीचे अध्यक्ष प्रकाश पाटील, कृषी पतीन सोसायटीचे अध्यक्ष दीपक कर्लेकर, सैनिक सोसायटीचे अध्यक्ष बाबुराव मुरकुटे, येळ्ळूर कुस्ती आखाडा समितीचे प्रदीप देसाई, छत्रपती शिवाजी सोसायटीचे अध्यक्ष मल्लाप्पा कुंडेकर, येळ्ळूर ग्रामपंचायतीचे अध्यक्ष सतीश पाटील, या सर्वांसह त्यांचे सहकारी यांनी भेटून संस्थेला शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर आनंद नगर रहिवासी संघटना, येळ्ळूर व वडगावचे अनेक नागरिक, सोसायटीचे हितचिंतक ठेवीदार सभासद यांनी प्रत्यक्ष भेटून संचालकांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी संचालक संजय मजूकर, भरतकुमार मुरकुटे, प्रा. सी. एम. गोरल, सी. एम. उघाडे, के. एन. गिंडे, भोमाणी छत्र्यांण्णावर, मिनाजी नाईक, के. बी. बंडाचे, सौ. अस्मिता पाटील, परशराम गिंडे, गणपती हट्टीकर, अनिल पाटील, के. एन. पाटील, रविकांत पाटील, शंकर मुरकुटे, प्रभाकर कणबरकर, पांडुरंग घाडी, अनिल मुरकुटे, महेश सैनूचे, मनोहर देसुरकर, दीपक हट्टीकर, चांगदेव मुरकुटे, रवी कणबरकर, विजय धामणेकर, संतोष कूगजी, सचिन मुरकुटे, सागर यरमाळकर, उत्तम घाडी, सुनील धामणेकर, सौ. कांचन पाटील, सौ. ज्योती यरमाळकर यांच्यासह संस्थेचे सभासद, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते
शेवटी प्रा. सी. एम. गोरल यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta