रायबाग : नातेवाईकांमध्ये झालेल्या किरकोळ वादाचे पर्यावसन मारामारीत झाले असून नंतर गोळीबार करण्यात आला आहे. सुदैवाने गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही. मात्र मारामारीत आरोपी श्रीशैल पाटील जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रायबाग तालुक्यातील हारुगेरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सावसुद्दी गावात गोळीबाराची घटना घडली आहे. आरोपीने परवाना असलेल्या बंदुकीतून गोळ्या झाडल्या आहेत. सुदैवाने जीवितहानी टळली आहे.
हारुगेरी पोलिस स्थानकात घटनेची नोंद झाली असून पुढील तपास सुरू आहे.
Belgaum Varta Belgaum Varta