येळ्ळूर : येथील येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा दिवंगत कृष्णा मुचंडी उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार दैनिक सकाळचे बेळगाव आवृत्ती प्रमुख श्री. मलिकार्जुन मुगळी यांना जाहीर करण्यात आला आहे.
येळ्ळूर येथे होणाऱ्या ग्रामीण साहित्य संमेलनात सदर पुरस्कार मान्यवरांचा हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
2020 सालापासून येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलन दरम्यान बेळगाव सीमा भागातील मराठी पत्रकाराला त्यांच्या सर्वोत्कृष्ट कार्यासाठी दिवंगत कृष्णा मुचंडी उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. सदरचा पहिला पुरस्कार पत्रकार श्रीकांत काकतीकर यांना देण्यात आला होता. त्यानंतर सदर पुरस्कार मल्लिकार्जुन मुगळी यांना जाहीर करण्यात आला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta