बेळगाव (प्रतिनिधी) : श्री सप्तकोटेश्वर देवस्थान समिती नार्वे डिचोली गोवा पुरातन खाते गोवा सरकार यांच्या वतीने गुरुवार दि. 9 फेब्रुवारी ते शनिवार दि. 11 फेब्रुवारी पर्यंत श्री सप्तकोटेश्वर मंदिराचा लोकार्पण सोहळा या कालावधीत संपन्न होत आहे. गुरुवार दि. 9 फेब्रुवारी पुण्याहवाचन, मातृकापूजन, नांदीश्राद्ध, आचार्यवरण, देवतास्थापना, मुख्यदेवता, भवानी शंकर श्री सप्तकोटेश्वर महारुद्र देवता महापूजा जीर्णोद्धार होम, बलिदान, पूर्णाहुती, महाआरती, ब्राम्हण संतर्पण, दुपारी 1 ते 3 महाप्रसाद, श्री लक्ष्मी भजन मंडळ, भजनाचा कार्यक्रम, घुमट आरती, नाटक शुक्रवार दि. 10 फेब्रुवारी पुण्याहवाचन, लघुरुद्र, महाअभिषेक, महापूजा, लघुरुद्र, स्वाहाकार, बलिदान, पूर्णाहुती, ब्राम्हण संतर्पण दुपारी 1 ते 3 महाप्रसाद, सायंकाळी देऊळवाडा नार्वे ग्रामस्थांतर्फे संस्कृती कार्यक्रम. शनिवार दि. 11 फेब्रुवारी सकाळी गोवा व महाराष्ट्रातील विविध किल्ले व पवित्र स्थानातील जलाभिषेक दुपारी 1.30 वाजता महाप्रसाद, सायंकाळी 4 वाजता उद्घाटन सोहळा, प्रमुख पाहुणे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, साताऱ्याचे आ. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. श्रीपाद नाईक, आ. निलेश काब्राल, आ. सुभाष फळ देसाई, आ. प्रेमेंद्र शेट, आ. विजय सरदेसाई, पुरातन खाते सचिव मिनिनो डिसोझा, श्री सप्तकोटेश्वर देवस्थान समिती अध्यक्ष पृथ्वीराज (उदय) सरदेसाई, उत्तम पार्सेकर, डॉ. निलेश फळ देसाई, शंकर चोडणकर, संदेश पार्सेकर, उन्नती पडोलकर, तुकाराम गावडे, इतिहासतज्ज्ञ पांडुरंग बलकवडे यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta