दक्षिण पश्चिम रेल्वे विभागाला निवेदन सादर
बेळगाव : बेळगावमधील वारकर्यांसाठी बेळगाव-पंढरपूर रेल्वे सेवा प्रत्येक दिवशी दोन वेळा पुन्हा उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी दक्षिण पश्चिम रेल्वे विभागाचे प्रिन्सिपल चीफ कमर्शिअल मॅनेजर ए. एस. राव यांना बेळगाव जिल्हा वारकरी संघातील वारकरी आणि श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर करण्यात आले.
वारकरी समुदाय व सर्व भक्तजन वर्षातून तीन ते चार वेळा पंढरपूरला जात असतात. तसेच महिन्याच्या एकादशीला देखील पंढरपूरला जात असतात. व सध्या आठवड्यातून एकच रेल्वे चालू आहे त्यामुळे पंढरपूरला जाण्यासाठी गैरसोय होत आहे. याआधी दिवसातून दोन वेळा पंढरपूरला रेल्वे होती. पण कोरोना काळामध्ये ती रद्द करण्यात आलेली आहे. ती रेल्वे पुन्हा सुरू करावी, अशी मागणी बेळगाव जिल्हा वारकरी संघातील वारकरी आणि श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांनी निवेदनाद्वारे केली.
यावेळी बेळगाव जिल्हा वारकरी संघाचे अध्यक्ष हभप शंकर बाबली महाराज, रमाकांत कोंडुस्कर, समिती नेते रणजीत चव्हाण-पाटील, सुनील आपटेकर, द-प रेल्वे विभागाच्या असिस्टंट कमर्शियल मॅनेजर निवेदिता, स्टेशन मास्टर, हभप सं. बं. हणमंताचे, संतराम पाटील, ज्ञानेश्वर पवार, पांडुरंग जाधव आदींसह वारकरी मंडळी उपस्थित होती.
Belgaum Varta Belgaum Varta